Join us

उर्वषी म्हणते,‘मला ‘ब्युटी क्वीन’ व्हायचंय’

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 08:17 IST

 २०१५ मिस युनिव्हर्स उर्वषी रौतेला तिचा आगामी चित्रपट ‘सनम रे’ मधून एन्ट्री करतेय. ती जेव्हा तिच्या या आगामी चित्रपटाविषयी ...

 २०१५ मिस युनिव्हर्स उर्वषी रौतेला तिचा आगामी चित्रपट ‘सनम रे’ मधून एन्ट्री करतेय. ती जेव्हा तिच्या या आगामी चित्रपटाविषयी बोलते तेव्हा ती अत्यंत उत्साहाने आणि एखाद्या लहान मुलीसारखी वाटते. चित्रपटाविषयीचा सर्वांत आकर्षक मुद्दा हा आहे की,‘ तिने कॅमेºयासमोर तिची चक्क बिकिनी बॉडी दाखवली आहे. तसेच ती म्हणते, ‘मी किसिंगच्या बाबतीत जास्त कम्फर्टेबल नाही.’  चित्रपटाच्या प्रदर्शित होण्याविषयी तर तिला उत्सुकता आहे पण ती म्हणते,‘ मला इंजिनियर व्हायचे होते. मी अभिनेत्री होण्याचा कधीही विचार केला नव्हता. मला ईशकजादे आॅफर केला होता. पण नंतर तो परिणीतीला देण्यात आला. मला खरंतर ब्युटी क्वीन व्हायचं होतं. लेट्स सी. मला आणखी किती दिवस लागतील.’