Join us

उर्वषी म्हणते,‘अजयला आवडेल का माझी भूमिका?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2016 22:09 IST

अभिनेत्री उर्वषी रौतेला सध्या ‘सनम रे’ मुळे खुप चर्चेत आहे. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरल्याने तिला अनेक असाईनमेंट्स मिळाल्या ...

अभिनेत्री उर्वषी रौतेला सध्या ‘सनम रे’ मुळे खुप चर्चेत आहे. तिचा पहिलाच चित्रपट हिट ठरल्याने तिला अनेक असाईनमेंट्स मिळाल्या आहेत. आता उर्वषी अडल्ट कॉमेडी ‘ग्रेट गॅ्रंड मस्ती’ मध्येही दिसणार असून ती म्हणते की, ‘अजय देवगणला माझी भूमिका आवडेल की नाही माहित नाही? ’पुढे ती म्हणते,‘या भूमिकेसोबत माझ्या खांद्यावर आता खुप मोठी जबाबदारी आली आहे. अजय देवगणला माझी भूमिका आवडेल अशी माझी अपेक्षा आहे. मी रितेश देशमुख, विवेक ओबेरॉय आणि अफताब शिवदासानी यांच्या गर्लफ्रेंडची भूमिका करणार आहे. माझी भूमिका अजय देवगण आणि लारा दत्ता यांनी ‘मस्ती’ मध्ये तयार केली होती. ही भूमिका करायला मजा येणार आहे. ’ दिग्दर्शक इंद्रकुमार यांच्या ‘ग्रेट गॅ्रंड मस्ती’ चित्रपटात श्रद्धा दास, मिश्ती, पूजा चोप्रा, सोनल चौहान आणि पूजा बोस असणार आहेत.