Join us
Daily Top 2Weekly Top 5

उर्वशी रौतलाच्या नखऱ्यांमुळे निर्मात्याची वाढली डोकेदुखी, इतक्या लाखांचा भरावा लागला भुर्दंड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2018 13:25 IST

'हेट स्टोरी 4' रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नाखऱ्यांमध्ये ही खूप वाढ झाली आहे. आपल्या मानधनातदेखील तिने वाढ केली ...

'हेट स्टोरी 4' रिलीज झाल्यानंतर अभिनेत्री उर्वशी रौतेलाच्या नाखऱ्यांमध्ये ही खूप वाढ झाली आहे. आपल्या मानधनातदेखील तिने वाढ केली आहे.  सध्या उर्वशी 'वर्जिन भानुप्रिया' चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. नुकतेच तिने असे काही केले की निर्मात्याला 2 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाची शूटिंग सकाळीत ठेवण्यात आली होती. उर्वशीला काही सीन्स सकाळी शूट करायचे होते मात्र तिने तसे करण्यास नकार दिला. उर्वशी म्हणाली मी सकाळी शूट करणार नाही शूटिंग संध्याकाळी ठेवण्यात यावं.    जेव्हा चित्रपटाचे निर्माता महेंद्र धारीवाल यांनी उर्वशीला या मागचे कारण विचारले त्यावेळी तिने मुंबईतल्या तापमानाचा पारा खूप चढला आहे आणि मला जो लहंगा परिधान करायचा आहे त्याचे वजन खूप जास्त आहे ऐवढ्या गर्मीत मी तो घालून शूट करु शकत नाही. शेवटी उर्वशीच्या नखऱ्यांपुढे निर्मात्याला हात टेकावेच लागलेय चित्रपटाची शूटिंग दिवसाऐवजी रात्री ठेवण्यात आली. त्यामुळे निर्मात्याचे 2 लाखांचे नुकसान झाले. ALSO READ :   Shocking! ​उर्वशी रौतेलाच्या नावे पंचतारांकित हॉटेलात रूम बुक करण्यासाठी बनावट आधार कार्डचा वापर!!नुकतेच उर्वशीचे नाव क्रिकेटर हार्दिक पांड्यासोबत जोडण्यात आले होते. हार्दिक उर्वशीला डेट करत असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी एका पार्टीच्या ठिकाणी दोघे एकत्र येताना स्पॉट झाले होते. तर काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, ती सलमान खानची चाहती आहेस काय? त्यावर तिने म्हटले की, मी सलमानची खूप मोठी चाहती आहे. केवळ चाहतीच नाही तर मला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील तरुणी सलमानवर फिदा आहेत. अनेकांनी तर त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखविली आहे. आता उर्वशीच्या मनात नक्की काय चालयं हे तिलाच माहिती. सनी देओलच्या ‘सिंग साहब दी ग्रेट’ या चित्रपटातून उर्वशीने बॉलिवूड डेब्यू केले होते. यानंतर ‘भाग जॉनी’, ‘सनम रे’ या चित्रपटांमध्ये उर्वशी दिसली.