Join us  

RP Urvashi Rautela : 'रिषभ पंत'ला भेटायला निघाली का ? विमानतळावर उर्वशीला पाहून नेटकऱ्यांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2022 4:30 PM

बातमी रिषभ पंतची म्हणल्यावर उर्वशी रौतेलाची चर्चा तर होणारच.

RP Urvashi Rautela :  टीम इंडियाचा यष्टीरक्षक रिषभ पंतच्या कारला काल भीषण अपघात झाला. तो गंभीर जखमी असल्याचे समजताच चाहत्यांच्या काळजात धस् झाले. परंतू, रिषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली असून तो बोलण्याच्या मनस्थितीत असल्याचे समजताच चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला. आता बातमी रिषभ पंतची म्हणल्यावर उर्वशी रौतेलाची चर्चा तर होणारच. उर्वशीनेही लगेच praying असे कॅप्शन टाकत स्वत:चाच एक फोटो पोस्ट केला आणि चर्चेला उधाण आलं.

दरम्यान, आज उर्वशी विमानतळावर स्पॉट झाली. ब्लॅक बॉडीकॉन ड्रेस, गॉगल लावीन तिला विमानतळआवर पाहताच कॅमेरामनने तिच्याभोवती नेहमीप्रमाणे गराडा घातला. आता तिला बघून नेटकरीही कमेंट बॉक्समध्ये जमा झाले. पंतला भेटायला देहरादूनला निघालीस का अशी कमेंट एकाने केली आहे. तर इतर नेटकरीही तिला रिषभ पंतवरुनच चिडवताना दिसले. पंत असो किंवा उर्वशी दोघांनीही सतत एकमेकांच्या नावावरुन चिडवले जात आहे आता पंतच्या अपघातानंतर तर उर्वशीची जास्तच आठवण काढली जात आहे.

पंत आणि उर्वशी मध्ये नेमका वाद काय ?

आरपी तिला दिल्लीतील हॉटेलच्या खोलीत भेटायला आला होता आणि तासनतास तिची वाट पाहत होता, असा दावा उर्वशीने केला होता. यानंतर सोशल मीडियावर दोघांमध्ये युद्ध सुरू झाले. उर्वशी रौतेलानेही त्याचे नाव न घेता 'छोटू भैया' म्हणून पोस्ट करण्यास सुरुवात केली. यावेळी रिषभने 'मेरा पीछा छोड़ दो दीदी' म्हटले होते.  

टॅग्स :उर्वशी रौतेलारिषभ पंतसोशल मीडियाइन्स्टाग्रामट्रोल