Join us

सर्वाधिक लोकप्रिय ठरली 'ही' अभिनेत्री, अमिताभ- शाहरुखलाही टाकलं मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 27, 2020 15:57 IST

मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात उर्वशीचा हा फोटो आहे. उर्वशीच्या  फोटोंना  नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत असतात.

सहजसुंदर अभिनय, घायाळ करणारं सौंदर्य आणि अदा तसंच लक्षवेधी स्टाईल यामुळे उर्वशी रौतेला रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवण्यास सुरुवात केली आहे. उर्वशी सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. आपल्या खासगी आणि सिनेमा तसंच आगामी प्रोजेक्टबद्दलची माहिती ती फॅन्ससह शेअर करते. ती आपले फोटोसुद्धा फॅन्ससह शेअर करत असते आणि त्यांच्याशी संवादही साधत असते. याआधीही उर्वशी रौतेला बरेच फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.

इतकेच नसून इन्स्ट्राग्रामवर तिचे 3 कोटी फॉलोअर्स पूर्ण झाल्याच्या आनंदात तिने शेअर केला आहे. आपल्या चाहत्यांचे आभार मानले आहेत. विशेष म्हणजे सोशल मीडियावरील लोकप्रियतेत तिने इन्स्टाग्राम फॉलोअर्सच्या बाबत उर्वशी रौतेला ही अमिताभ बच्चन आणि शाहरुख खानच्याही पुढे गेली आहे. इंस्टाग्रामवर अमिताभ बच्चने याचं 2.21 कोटी फॉलोअर्स आहे, तर शाहरुख खान याचे 2.24 कोटी फॉलोअर्स आहे.अशात उर्वशी अत्यंत आनंदात आहे. 

फॅन्सकडून प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक क्षणाला मिळणारं प्रेम हे विशेष तसंच  तितकंच खास असतं. ते मिळत असल्यानं स्वतःला नशीबवान समजत आहे अशा शब्दांत तिने आपल्या सर्व फॅन्सचे आभार मानले आहेत. याच प्रेमामुळेच आनंदी, हसतमुख असून मिळणारं सगळं यश हे फॅन्सचे असल्याचे तिने नमूद केले आहे. 

नुकताच उर्वशी काही फोटो शेअर केले असून यांत तिचा बोल्ड आणि हॉट अंदाज पाहायला मिळत आहे. तिचा हा अंदाज कुणालाही घायाळ करेल. सोशल मीडियावर नेहमीच तिच्या फोटोची चर्चा रंगली असते.तिचा स्टनिंग अंदाज तुम्हालाही क्लीन बोल्ड केल्याशिवाय राहणार नाही. मादक अदा आणि त्याहून सेक्सी पोझ आणि हॉट ड्रेसिंग अशा अवतारात उर्वशीचा हा फोटो आहे. उर्वशीच्या  फोटोंना  नेटिझन्सकडून बरेच लाइक्स आणि कमेंट्सही मिळत असतात.

टॅग्स :उर्वशी रौतेलाअमिताभ बच्चन