Join us  

Video: साडी नेसून उर्वशीने लग्नात केला धमाकेदार भांगडा, व्हायरल झाला व्हिडीओ...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2020 10:21 AM

उर्वशीला तुम्ही सिनेमात अनेकदा ड्रेसमध्ये अफलातून डान्स करताना पाहिलं असेल पण तिला साडीत भांगडा करताना नक्कीच पाहिलं नसेल.

काही दिवसांपूर्वीच अभिनेत्री उर्वशी रौतेलाचा बनारसी पान खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तिचा एका लग्नात साडी नेसून भांगडा करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. उर्वशीला तुम्ही सिनेमात अनेकदा ड्रेसमध्ये अफलातून डान्स करताना पाहिलं असेल पण तिला साडीत भांगडा करताना नक्कीच पाहिलं नसेल. सोबतच उर्वशी या साडीत सुंदर दिसत असून फॅन्स तिची प्रशंसाही करत आहेत. 

उर्वशी कुणाच्यातरी लग्नात पोहोचली असून तिथे ती काही लोकांसोबत धमाल भांगडा करताना दिसत आहे. अशाप्रकारे धमाकेदार एन्ट्री घेऊन तिने लग्नात चार चांद लावले आहेत. 

उर्वशी रौतेलासोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव राहते. तिचा नुकताच बनारसी पान खातानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याआधी ती गायिका नेहा कक्करच्या लग्नातही दिसली होती. या लग्नातीलही तिचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. आता तिचा हा व्हिडीओही फॅन्सना आवडला आहे. 

काही दिवसांपूर्वी उर्वशीचा एक म्युझिक व्हिडीओही रिलीज झाला होता. या गाण्याचे बोल 'वो चांद कहां से लाओगी' हे गाणं विशाल मिश्राने गायलं आहे. या गाण्यात उर्वशी रौतेलासोबत मोहसीन खानची जोडीही चांगली दिसत आहे.  

टॅग्स :उर्वशी रौतेलाबॉलिवूडसोशल मीडिया