Join us

‘उरी’चे अभिनेते नवतेज हुंडल यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2019 15:16 IST

‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचे अभिनेते नवतेज हुंडल यांचे सोमवारी निधन झाले.

ठळक मुद्देनवतेज यांची मुलगी अवंतिका हुंडल ही सुद्धा एक अभिनेत्री आहे

उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या सुपरडुपर हिट चित्रपटाचे अभिनेते नवतेज हुंडल यांचे सोमवारी निधन झाले. सिंटाने (CINTAA) आपल्या अधिकृत  ट्विटर हँडलवर याबाबतची माहिती दिली आहे.  त्यांच्या मागे पत्नी व दोन मुली आहेत.

हुंडल ‘‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ या चित्रपटात अखेरचे दिसले होते. या चित्रपटात त्यांनी गृहमंत्र्यांची भूमिका साकारली होती. त्यापूर्वी त्यांनी संजय दत्तच्या ‘खलनायक’, ‘तेरे मेरे सपने’, ‘द विस्परर्स’ यासारख्या चित्रपटांत काम केले होते. अभिनयासोबत ते अभिनयाचे प्रशिक्षण देत. नवतेज यांची मुलगी अवंतिका हुंडल ही सुद्धा एक अभिनेत्री आहे. दिव्यंका त्रिपाठी व करण पटेल स्टारर ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेत ती मिहिकाची भूमिका साकारते आहे.

टॅग्स :उरी