Join us

उर्फी जावेद विकतेय तिचा ड्रेस; किंमत एवढी की, ऐकून बसेल धक्का...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2024 10:32 IST

उर्फी तिचा एक ड्रेस विकणार आहे.

उर्फी जावेद (urfi javed ) हे नाव आता खूप प्रसिद्ध झालंय. इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद तिच्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असते. सोशल मीडियीवर रोज दुसऱ्या दिवशी तिच्या नवनवीन आउटफिट्सचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. उर्फी जावेद ही सोशल मीडियावर नेहमीच फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.  उर्फीने नुकतंच सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा तिने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

उर्फी तिचा एक ड्रेस विकणार आहे. उर्फीने शनिवारी इन्स्टाग्राम हँडलवर एक काळ्या रंगाच्या सुंदर ड्रेसचा फोटो शेअर केला आहे. तिने फोटो शेअर करत लिहिले की, "मी माझा फुलपाखरं असलेला ड्रेस विकण्याचा विचार केला आहे. हा ड्रेस सगळ्यांच्याच पसंतीस पडला होता. किंमत  ३,६६,९०,००० रुपये फक्त. ज्यांना हा ड्रेस खरेदी करायचा आहे त्यांनी मला DM करा".  उर्फीच्या या ड्रेसची किंमत ऐकून सगळ्यांनाच धक्का बसलाय. 

उर्फीच्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट करत लिहलं की,"एमआयवर घेता येईल का? मी मोतीचूरचा लाडू कर म्हणून देऊ शकतो". तर एकाने लिहलं, "जर मी अंबानींची मुलगी असते तर नक्कीच घेतला असता". एवढंच काय तर उर्फीची बहीण डॉलीनं देखील त्यावर कमेंट करत लिहिलं की "मी हा ड्रेस खरेदी केला असता, पण माझ्याकडे एक डॉलर कमी आहे".  एका नेटकऱ्यांनं लिहलं, "1000 रुपयात द्यायचा असेल तर दे नाही तर मी पुढे जाते".

आज उर्फी खूप आलिशान आयुष्य जगते. उर्फी जावेदची रोजची कमाई लाखोंमध्ये आहे. रिपोर्ट्सनुसार उर्फी जावेदच्या कमाईचा सर्वात मोठा सोर्स हा सोशल मीडिया आहे. मिलियनमध्ये तिचे फॉलोअर्स असल्याने ती एक लोकप्रिय इन्फ्युएन्सर झाली आहे. त्यामुळेच अनेक मोठे ब्रँड तिच्यासोबत कोलॅब करतात. .'बडे भैया की दुल्हनिया', 'मेरी दुर्गा', 'तेढी मेढी फॅमिली' यांसारख्या मालिकांमध्ये दिसलेल्या उर्फी जावेदने अभिनयातही आपलं कौशल्य देखील दाखवलं आहे. अलिकडेच उर्फी तिची प्रमुख भूमिका असलेली 'फॉलो कर लो यार' या नव्या वेबसीरिजमध्ये झळकली.

टॅग्स :उर्फी जावेदसेलिब्रिटी