Join us

ओटीटीसह थिएटरमध्ये रिलीज होणार धमाकेदार चित्रपट आणि वेब सीरिज, घ्या जाणून

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:26 IST

थिएटरसह ओटीटीवरही मनोरंजनाची मेजवानी मिळणार आहे.

Upcoming New Movies And Web Series: ओटीटी (OTT) आणि थिएटरमध्ये रिलीज होणाऱ्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. या आठवड्यातही मोठ्या पडद्यावर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.  चला तर जाणून घेऊया या आठवड्यात कोणत्या सीरिज आणि चित्रपट हे थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहेत. या यादीत पहिल्या क्रमाकांवर आहे बॉलिवूड अभिनेता आमिर खान याचा 'सितारे जमीन पर' (Sitaare Zameen Par) हा चित्रपट. येत्या २० जून २०२५ ला 'सितारे जमीन पर' थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात आमिर खानसोबत बॉलिवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुखदेखील आहे. 'सितारे जमीन पर' हा चित्रपट २००७ साली रिलीज झालेल्या 'तारे जमीन पर' चित्रपटाचा सीक्वल आहे.  

ओटीटीबद्दल बोलायचं झालं तर अभिनेता इमरान हाश्मी (Emraan Hashmi) चा 'ग्राउंड झिरो' (Ground Zero) प्राइम व्हिडीओवर (Prime Video) येतोय. हा चित्रपट तुम्ही २० जून रोजी पाहू शकाल.  या चित्रपटात २००३ मध्ये भारतीय सुरक्षा दलाने आतंकवादी गाजी बाबाचा खात्मा करण्यासाठी केलेले स्पेशल ऑपरेशन दाखवण्यात आलं आहे. 'ग्राउंड झिरो' हा २५ एप्रिल रोजी देशभरातील चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.  याशिवाय, 'प्रिन्स अँड फॅमिली' हा चित्रपट २० जून रोजी ZEE5 या OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. 

'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा येत्या २१ जून रोजी नेटफ्लिक्सवर परतत आहे. याआधी या कार्यक्रमाचे दोन सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. आता त्याचा तिसरा सीझन  येत आहे. विशेष म्हणजे यावेळी अर्चना पूरण सिंगसोबत नवज्योत सिंग सिद्धू देखील असणार आहेत. रिपोर्टनुसार या सीझनच्या पहिल्या भागात सलमान खान पाहुणा म्हणून पाहायला मिळणार आहे. तर दिलजीत दोसांझ, डायना पेंटी, चंकी पांडे आणि बोमन इराणी यांचा 'डिटेक्टिव्ह शेरदिल' हा चित्रपट ZEE5 वर २० जून रोजी प्रदर्शित होणार आहे. 

बॉलिवूडसोबतच काही हॉलिवूड सीरिजही प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एडिथ व्हार्टनच्या अपूर्ण कादंबरीवर आधारित 'द बुकेनियर्स सीझन २' (The Buccaneers Season 2) देखील प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. पहिल्या सीझनच्या यशानंतर निर्माते आता दुसऱ्या सीझनसह परतत आहेत. ही सीरिज १८ जून रोजी Apple TV वर प्रदर्शित होईल. याशिवाय, 'द होल्डओव्हर्स' (The HoldOvers) हा कॉमेडी चित्रपट नेटफ्लिक्सवर (Netflix) येतोय. येत्या २० जून हा चित्रपट प्रदर्शित होईल. 

टॅग्स :सिनेमानेटफ्लिक्सवेबसीरिजइमरान हाश्मीआमिर खान