Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unseen Pics : इतक्या वर्षांनंतर का व्हायरल होत आहेत ऐश्वर्या-अभिषेकच्या लग्नाचे फोटो?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2019 14:44 IST

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. ऐश-अभि दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत.  तूर्तास या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ठळक मुद्दे2007 मध्ये 21 एप्रिल रोजी अभिषेक-ऐश्वर्या साता जन्माच्या गाठीत अडकले.

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाला 12 वर्षांपेक्षा अधिक काळ झाला. ऐश-अभि दोघेही आपल्या संसारात आनंदी आहेत.  तूर्तास या दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरे तर आज ना ऐश-अभिचा बर्थ डे आहे, ना लग्नाचा वाढदिवस. पण तरीही दोघांच्या लग्नाचे अनेक फोटो सोशल मीडियावर धूम करत आहेत. का तर सुप्रसिद्ध डिझाईनर अबू जानी संदीप खोसला यांनी इतक्या वर्षांनंतर हे फोटो शेअर केले आहेत.

या फोटोत अमिताभ बच्चन, जया बच्चन, श्वेता बच्चन असे सगळे दिसत आहेत. भावाच्या लग्नात श्वेता कमालीची आनंदी दिसत आहेत. अनेक ठिकाणी ती मिरवताना दिसतेय.

एक फोटो अभिषेक व ऐश्वर्याच्या संगीत सेरेमनीचा आहे. यात अमिताभ व श्वेता थिरकताना दिसत आहेत. संगीत सेरेमनीमध्ये अभिषेक व ऐश्वर्याची एन्ट्री झाली, त्या क्षणाचा एक फोटोही व्हायरल होतोय. यात ऐश्वर्या आकाशी रंगाच्या साछीत आहेत तर अभिषेकने क्रिम कलरची शेरवानी परिधान केलेली आहे.

संगीत सेरेमनीत जया आणि अमिताभ दोघेही धम्माल डान्स करत आहेत. लग्नमंडपातील या फोटोत अभिषेक अतिशय देखणा दिसतोय. जया बच्चन यांनी लग्नमंडपात जाण्यापूर्वी अभिषेकला ओवाळले, त्या क्षणाचा फोटोही व्हायरल होतोय. करिश्मासोबत लग्न मोडल्यानंतर ऐश्वर्यासोबत अभिषेकचे नाते जुळले. ऐश्वर्या बच्चन कुटुंबाची सून होणार म्हणून तिचे कुटुंबसुद्धा आनंदात होते. 2007 मध्ये 21 एप्रिल रोजी अभिषेक-ऐश्वर्या साता जन्माच्या गाठीत अडकले. अभिषेक-ऐश्वर्याचे लग्न बी टाऊनमधील सर्वात मोठा सोहळा होता. त्यांच्या लग्नात बॉलिवूडसोबतच, राजकारणी, उद्योगपती, क्रिकेटर्स सहभागी झाले होते.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनअभिषेक बच्चन