Join us
Daily Top 2Weekly Top 5

Unseen Pics : रिसेप्शनपूर्वी पाहा प्रियांका चोप्रा व निक जोनासचे रोमॅन्टिक फोटो!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2018 13:23 IST

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. उद्या २० डिसेंबरला प्रियांका व निकचे मुंबईत ग्रण्ड रिसेप्शन होणार आहे.

ठळक मुद्दे प्रियांका व निकच्या लग्नाचे अनेक नवे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटोतील प्रियांका व निकचा रॉयल अंदाज घायाळ करणारा आहे.

प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांनी लग्नगाठ बांधली. जोधपूरच्या उमेद भवनात गत १ व २ डिसेंबरला ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने दोघांनीही लग्न केले. उद्या २० डिसेंबरला प्रियांका व निकचे मुंबईत ग्रण्ड रिसेप्शन होणार आहे. साहजिकच प्रियांका व निकप्रमाणेचं चाहतेही उत्सूक आहेत. या उत्साहात भर घालणारे निकयांकाच्या लग्नातील काही फोटो समोर आले आहेत. यातील एक फोटो प्रियांकाने स्वत: इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या रोमॅन्टिक फोटोत निकने प्रियांकाला अलगद उचलले आहे.

 याशिवाय प्रियांका व निकच्या लग्नाचे अनेक नवे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे फोटोतील प्रियांका व निकचा रॉयल अंदाज घायाळ करणारा आहे.

तूर्तास प्रियांका व निकच्या मुंबईतील रिसेप्शनची जोरदार तयारी सुरू आहेत.  मुंबईतील रिसेप्शनमध्ये प्रियांका-निक कोणत्या लूकमध्ये दिसतील याचीही  उत्सुकता  आहे. याविषयी सोशल मीडियावर बरीच चर्चा होत आहे.

गत १ डिसेंबरला प्रियांकाने ख्रिश्चन पद्धतीने लग्न केले. यानंतर काल २ डिसेंबरला तिने हिंदू पद्धतीने निकसोबत लग्नगाठ बांधली. लग्नापूर्वी प्रियांकाने बॉलिवूडचा ‘द स्काय इज पिंक’ हा चित्रपट हातावेगळा केला. या चित्रपटात प्रियांका फरहान अख्तरसोबत दिसणार आहे.

लग्नानंतर प्रियांका पुन्हा एकदा अभिनयाकडे वळणार आहे आणि भन्साळींसारख्या ‘लार्जर दॅन लाईफ’ दिग्दर्शकाच्या चित्रपटात काम करणार आहे. साहजिकच, आत्तापर्यंत अशी भूमिका साकारली नसल्यामुळे ‘लेडी डॉन’च्या भूमिकेत प्रियांकाला पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे या   यापूर्वी ‘सात खून माफ’ या चित्रपटात प्रियांकाने नकारात्मक भूमिका साकारली होती. 

टॅग्स :प्रियंका चोप्राप्रियांका चोप्रा आणि निक जोनास