Join us
Daily Top 2Weekly Top 5

​भारताच्या या एकमेव मॉडेलने Playboy मॅगजिनसाठी केला होता न्यूड फोटो शूट, केला चकित करणारा खुलासा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 12:23 IST

भारतीय मॉडल शर्लिन चोपडा आपल्या बोल्ड अंदाजाने ओळखली जाते. ती असे काही वेगळे करते किंवा वक्तव्य करते ज्यामुळे नेहमी ...

भारतीय मॉडल शर्लिन चोपडा आपल्या बोल्ड अंदाजाने ओळखली जाते. ती असे काही वेगळे करते किंवा वक्तव्य करते ज्यामुळे नेहमी चर्चेत राहते. मग तिचा कामसूत्र चित्रपट असो की, प्लेबॉयसाठी तिचा न्यूड फोटो शूट असो. विशेष म्हणजे संपूर्ण जगात प्रकाशित होणाऱ्या लोकप्रिय पुरुषांचे मॅगजिन प्लेबॉयमध्ये दिसणारी भारताची एकमेव मॉडल-अभिनेत्री ही शर्लिन चोपडा आहे.  २०१२ मध्ये तिने प्लेबॉय मॅगजिनसाठी न्यूड फोटो शूट केला होता. यामुळे मात्र ती खूपच चर्चेत आली होती. आज प्लेबॉय मॅगजिनचे संस्थापक ह्यू हेफनरचे निधन झाले आहे म्हणून शर्लिन चोपडाने आपल्या ट्विटर अकाउंटवर त्यांना श्रद्धांजली दिली आहे. तिने ट्विट केले आहे की, ‘परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो, ह्यू हेफनर आपण अग्रणी इनोव्हेटर होते.’     फोटो शूट नंतर शर्लिन चोपडाने सांगितले होते की, तिला ही संधी कशी मिळाली होती. शर्लिन सांगते की, ह्यू हेफनर यांना प्लेबॉयच्या कव्हर शूटसाठी निरोप दिला होता आणि त्यांचा त्वरित पॉझिटिव्ह रिप्लाय आला होता. त्यानुसार शर्लिन २०१२ मध्ये प्लेबॉयसाठी शूट करण्यासाठी गेली होती. त्यावेळी शर्लिनने एक खुलासा केला होता की, ह्यू हेफनरची इमेज लोकांसमोर ज्या प्रकारची सांगितली जाते, मुळात त्यांच्या रियल लाइफमध्ये ते तसे नाहीत. यावेळी तिने हेफनरची खूप प्रशंसाही केली होती. शर्लिन चोपडाने रेड स्वास्तिक आणि कामसुत्र ३डी यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. याशिवाय एमटीव्ही स्प्लिट्सविलादेखील केले आहे. बॅड गर्ल नावाचा म्यूझिक अल्बमही केला असून बिग बॉस-३ मध्येही दिसली होती.    शर्लिनचा जन्म हैदराबादमध्ये झाला असून तिचे वडिल डॉक्टर होते. तिने स्टेनले गर्ल्स हायस्कूल आणि सेंट एन्न कॉलेज फॉर वूमेन, सिकन्दराबाद येथून शिक्षण घेतले आहे.