Join us

​आयुष्यमानचा आईसाठी आगळावेगळा संदेश...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2016 21:46 IST

आज मदर्स डे..आजच्या दिवशी अनेकजण आईला विश करतील. पण अभिनेता आयुष्यमान खुराणा याने आपल्या आईला आगळ्यावेगळ्या पद्धतीने विश केले. ...

आज मदर्स डे..आजच्या दिवशी अनेकजण आईला विश करतील. पण अभिनेता आयुष्यमान खुराणा याने आपल्या आईला आगळ्यावेगळ्या पद्धतीने विश केले. आईने आपल्याला जन्म दिला...कुणी असो, नसो ती कायम आपल्या पाठीशी उभी राहिली..प्रत्येक वळणावर तिने सोबत केली..पण आपल्यापैकी कितीजण या गोष्टींसाठी आईला धन्यवाद देतात. कदाचित फार मोजकेच..आईला आपण अनेकदा गृहित धरतो. कारण कुणीही नसले तरी आई नेहमीच आपल्याला पंखांखाली घेण्यासाठी तिथेच उभी असते...अलीकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण मदर्स डेच्या निमित्ताने का होईना, आईबद्दलच्या भावना व्यक्त करताना दिसतात. आयुष्यमान खुराणा यानेही या निमित्ताने त्याच्या आईसाठी स्वहस्ताक्षरातील संदेश पोस्ट केले आहे. कुणाच्याही डोळ्यात पाणीच येईल, असा हा संदेश आहे...वाचू यात, त्याचा संदेश, त्याच्याच शब्दांत...प्रिय आई,मी रोज तुला फोन करू शकत नाही, पण तुझी आठवण होत नाही, असा एक दिवसही जात नाही. एक व्यक्ति म्हणून मी तुझे वर्णन करू शकत नाही. तू कधीही काहीच बोलत नाही, पण जेव्हा केव्हा तू मला बघतेस, तेव्हा तुझे डोळे बोलायला लागतात. तुझे असे व्यक्त होणे, माझ्यासाठी खास असते. आजही तू शगुनाचे पैसे लिफाफ्यात घालून देतेस. ते खरोखरच गोड आहे. माझ्यातील संयम, समाधानी वृत्ती आणि गालावरची खळी सर्वच तुझीच देण आहे. मी या गोष्टी कधीच तुला बोलून दाखवल्या नाहीत. तू जशी आहेस, तशीच राहिलीस, यासाठी धन्यवाद. मदर्स डेच्या शुभेच्छा आई...तुझाचआयुष/ निशु