Join us

OMG! राणी मुखर्जीचा ड्रेस बघून लोकांना आठवले ‘बप्पी दा’, पण का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 15:10 IST

कमेंट्स वाचून येईल हसू

ठळक मुद्देयाआधीही अनेकदा राणी कपड्यांवरून ट्रोल झालीय.

राणी मुखर्जी एक गुणी अभिनेत्री आहे, यात काहीही शंका नाही. पण स्टाईलच्या बाबतीत मात्र राणी कायम चाहत्यांना निराश करते. ‘मर्दानी 2’मधील आपल्या अभिनयाने चाहत्यांचे मन जिंकणारी राणी सध्या तिच्या फॅशन सेन्समुळे ट्रोल होतेय.रविवारी रात्री मुंबई पोलिसांचा ‘उमंग 2020’ हा सोहळा रंगला. या सोहळ्याला बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली. राणीही या सोहळ्याला पोहोचली. पण तिचे लूक मात्र चाहत्यांना जराही भावले नाही.

यावेळी राणीने गोल्डन रंगाचा ड्रेस कॅरी केला होता. गोल्डन रंगाच्या पँट सूटसोबत काळ्या रंगाचा टॉप तिने मॅच केला होता. तिचा हा लूक व्हायरल झाला आणि लोकांनी राणीला ट्रोल करणे सुरु केले.

एका युजरने चक्क राणीला ‘लेडी बप्पी लहरी’ संबोधले. एका युजरने तर राणीला त्वरित नव्या स्ट्राईलिशला भेटण्याचा सल्ला दिला.याआधीही अनेकदा राणी कपड्यांवरून ट्रोल झालीय. अगदी अलीकडे राणी  बॉलिवूडचा सुप्रसिद्ध डिझाईनर सब्यसाचीने डिझाईन केलेल्या फ्लोरल सूटमध्ये दिसली होती. विशेष म्हणजे, तिच्या या सूटसारख्या  सेम प्रिंटच्या शेरवानीत रणवीर सिंगही दिसला होता.

राणी व रणवीरचा हा सेम टू सेम अवतार पाहून लोकांनी राणीला ट्रोल केले होते. तू अगदी रणवीर सिंग दिसतेस, रणवीर सिंगच्या शेरवानीच्या उरलेल्या कापडातून ड्रेस शिवलास का, अशा मजेदार कमेंट्स नेटकºयांनी दिल्या होत्या. 

टॅग्स :राणी मुखर्जी