Join us

​‘उडता पंजाब’चा वाद आता...सर्वाेच्च न्यायालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2016 17:36 IST

‘उडता पंजाब’ला सेन्सॉरच्या कात्रीतून सोडवून मुंबई उच्च न्यायालयाला २४ तास होत नाही, तोच पंजाबातील एका सेवाभावी संस्थेने उडता पंजाबवर ...

‘उडता पंजाब’ला सेन्सॉरच्या कात्रीतून सोडवून मुंबई उच्च न्यायालयाला २४ तास होत नाही, तोच पंजाबातील एका सेवाभावी संस्थेने उडता पंजाबवर आक्षेप घेत प्रदर्शनच थांबविण्याची मागणी सर्वाेच्च न्यायालयात केली आहे. या चित्रपटात पंजाबचे चित्रण अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आले असल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केला आहे. त्यामुळे चित्रपटाला अजून एका वादाला सामोरे जावे लागणार आहे. पंजाबातील ड्रग्जच्या समस्येवर प्रकाशझोत टाकणारा हा चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित होणार आहे. त्यापूर्वीच ‘ह्युमन राइट्स अवेरनेस असोसिएशन’ या संस्थेने याचिका दाखल केली आहे. तातळीने सुनावणी द्यावी अशी विनंती केल्यानंतर उद्या गुरुवारी सुनावणी करण्याचा निर्णय न्यायालयाने घेतला आहे.