‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट केले आणि बॉलिवूडमध्ये जणू ‘भूकंप’ आला. होय, या ट्विटमध्ये उदयने आत्महत्येचा विचार बोलून दाखवला. ‘मी माझे ट्विटर अकाऊंट काही तासांसाठी डि-अॅक्टिवेट केलेय. असे वाटले मी मरणार आहे. हे अभूतपूर्व होते. माझ्यामते, आत्महत्या एक चांगला पर्याय आहे. मी लवकरच हा पर्याय स्थायीरूपात स्वीकारू शकतो,’ असे त्याने आपल्या ट्विटमध्ये लिहिले. ‘मी ठीक नाही, हे मी कबुल करतो. आत्तापर्यंत मी प्रयत्न करतोय पण अपयशी ठरतोय,’असेही त्याने म्हटले होते.
उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये! आधी केले ‘सुसाईड’चे ट्विट नंतर केला खुलासा!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2019 15:45 IST
‘मोहब्बतें’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करणारा अभिनेता उदय चोप्रा अलीकडे त्याच्या एका ट्विटमुळे चर्चेत आला. सहा वर्षांपूर्वी आलेल्या ‘धूम 3’मध्ये उदय अखेरचा दिसला होता. यानंतर कुठल्याही तो चित्रपटात दिसला नाही. दोन दिवसांपूर्वी उदयने एक ट्विट केले आणि बॉलिवूडमध्ये जणू ‘भूकंप’ आला.
उदय चोप्रा डिप्रेशनमध्ये! आधी केले ‘सुसाईड’चे ट्विट नंतर केला खुलासा!!
ठळक मुद्देयश चोप्राचा मुलगा व आदित्य चोप्राचा भाऊ असलेल्या उदयने यश राज फिल्म्स बॅनरखालील अनेक चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शकाचे काम केले आहे.