दोन सुपरस्टार्सची जमली गट्टी; शाहरूख खान अन् ब्रॅड पिट आलेत एकत्र!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2017 14:58 IST
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट या दोघांनाही एकत्र पाहण्याचा योग किती आनंददायी असेल! होय ना? बुधवारी हा योग जुळून आला. शाहरूख व ब्रॅड दोघेही एकत्र दिसले. निमित्त होते ‘वॉर मशीन’ या चित्रपटाच्या प्रमोशनचे.
दोन सुपरस्टार्सची जमली गट्टी; शाहरूख खान अन् ब्रॅड पिट आलेत एकत्र!
बॉलिवूड सुपरस्टार शाहरूख खान आणि हॉलिवूड सुपरस्टार ब्रॅड पिट या दोघांनाही एकत्र पाहण्याचा योग किती आनंददायी असेल! होय ना? बुधवारी हा योग जुळून आला. शाहरूख व ब्रॅड दोघेही एकत्र दिसले. निमित्त होते ‘वॉर मशीन’ या चित्रपटाच्या प्रमोशनचे. ब्रॅड या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी भारतात येतो आहे वा नाही, याची कुणालाही कल्पना नसताना अचानक ब्रॅड भारतात आला. त्यातच शाहरूख खानसोबत ब्रॅडला पाहून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला.ब्रॅड शाहरूख खानसोबत चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी पीव्हीआरला पोहोचला. याठिकाणी दोघांनीही मीडियाच्या प्रश्नांना मनमोकळी उत्तरे दिलीत. शाहरूखने ब्रॅड पिटसोबतचा त्याचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला. यावेळी बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास आपल्याला आनंदच होईल, पण एक अडचण आहे,असे ब्रॅड म्हणाला. कितीही इच्छा असली तरीही मी बॉलिवूडमध्ये काम करू शकत नाही. कारण मला ना डान्स येत, ना गाणे गाता येत, असे ब्रॅड म्हणाला. यावर शांत राहणार, तो शाहरूख कुठला. तू त्याची चिंता करू नको, मी स्वत: तुला डान्स शिकवेल, असे शाहरूख ब्रॅडला म्हणाला. ब्रॅडनेही शाहरूखला हसून दाद दिली. ब्रॅड व शाहरूखने याक्षणी बरेच एन्जॉय केले. हिंदी चित्रपटांतील डान्स व गाण्यांची चर्चा आली, तेव्हा मला गाता येत नाही, असे ब्रॅड म्हणाला. यावर शाहरूखने चांगलीच गुगली टाकली. मलाही येत नाही. आमच्यापैकी कुणालाही गाता येत नाही. आमच्यासाठी दुसरेच कुणी गातात, असे तो म्हणाला. यावर ब्रॅड खळखळून हसला.ब्रॅड पिटसोबतचा स्वत:चा फोटो शाहरूखने सोशल मीडियावर शेअर करताच, नेटीजन्सनी त्यावर भरभरून प्रतिक्रिया दिल्या.