Join us

 क्रेझी गर्ल्स!! कार्तिक आर्यनला फॉलो करत घरापर्यंत पोहोचल्या त्या दोघी, Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2022 17:16 IST

Video: होय, या दोन क्रेझी गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि यानंतर ट्विटरवर #KartikAaryan ट्रेंड होतोय.

आपल्या आवडत्या स्टारची एक झलक पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी फॅन्स काय करतील याचा नेम नाही. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक जण आपल्या आवडत्या स्टारला फॉलो करतात. पण दोन क्रेझी तरूणी अभिनेता कार्तिक आर्यनला ( Kartik Aarayan) फॉलो करत करत त्याच्या घरापर्यंत पोहोचल्या आणि मग त्यांनी जे काही केलं ते पाहून सगळेच थक्क झालेत. होय, या दोन क्रेझी गर्लचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि यानंतर ट्विटरवर #KartikAaryan ट्रेंड होतोय. युजर्स या मुलींना भेटण्यासाठी कार्तिकची मनधरणी करताना दिसत आहेत.

व्हिडीओत दोन मुली कार्तिकच्या घराबाहेर उभ्या राहून कार्तिक प्लीज बाहर आओ, प्लीज असं म्हणत जोरजोरात ओरडत आहेत. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या दोन तरूणी घरासमोर ओरडत असताना कदाचित कार्तिक आर्यन घरी नसावा. त्यामुळे त्या दोघींनाही त्याला भेटता आले नाही. पण हो, त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच हिट झाला.

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी धम्माल प्रतिक्रिया दिल्या आहेत. इतक्या आर्जव करताहेत, तर भेट रे त्यांना, अशी विनंती अनेक युजर्सनी कार्तिकला केली आहे. आता कार्तिक या विनंतीला किती मान देतो, ते बघूच.

कार्तिकच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्याच्याकडे अनेक प्रोजेक्ट आहेत. गेल्यावर्षी त्याचा धमाका हा सिनेमा रिलीज झाला होता. लवकरच तो फ्रेडी, कॅप्टन इंडिया, भुल भुलैय्या 2, शहजादा या सिनेमात झळकणार आहे. साजिद नाडियाडवालाचा एक सिनेमाही त्यानं साईन केला आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यन