Join us
Daily Top 2Weekly Top 5

​ट्विंकल म्हणते, स्त्रीवादी असल्याचा गर्व; चुकीचा अर्थ काढणारे मूर्ख

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2016 20:33 IST

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी तिने स्वत:ला ‘स्त्रीवादी’ ...

बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिच्या ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकाचे विमोचन करण्यात आले. यावेळी तिने स्वत:ला ‘स्त्रीवादी’ म्हणविताना गर्व होत असल्याचे सांगितले, सोबतच स्त्रीवादी असण्याचा चुकीचा अर्थ काढणारे मूर्ख असल्याचा टोलाही तिने लगावला. अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल हिच्या पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला अनेक बॉलिवूड सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहर याने केले. यावेळी करणने, तुझे पुस्तक स्त्रीवादी प्रकृतीचे आहे असा प्रश्न विचारला, मात्र तिने करणला मध्येच थांबविले. ट्विंकल म्हणाली, मला काही सांगायचे आहे, येथे असेलले बरेचसे पत्रकार ज्यांनी हे पुस्तक वाचले आहे. ते माझ्या स्त्रीवादी असण्याच्या प्रश्नावर माझी अडचण समजू शकतात. या प्रश्नाकडे ते असे पाहतात जसे तुम्ही जस्टीन बीबरचे फॅन आहात का? या प्रश्नाकडे पाहतात. मात्र स्त्रीवादी होण्याचा अर्थ सर्वांसाठी समानता असणे हा आहे. जे लोक यावर विश्वास करीत नाहीत किंवा हे मानायला तयार नाहीत ते सर्व मूर्ख आहेत. ट्विंकल आपल्या मताचा खुलासा करताना म्हणाली, आजची स्त्री पुरुषांनी तयार केलेल्या पिंजºयातून मुक्त होण्याचा प्रयत्न करीत आहे. जगभरातील स्त्रीया आपली जागा शोधण्यासाठी खूप मेहनत करीत आहेत. त्यांना त्यांची जागा मिळायलाच हवी. मात्र पुरुषांनी स्त्रीयांना कैद करून ठेवले आहे, आणि त्यांचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. सामाजिक स्तरावर स्त्रीयांवर अशा पद्धतीने प्रतिबंध लावण्यात आले आहेत ज्यातून त्यांची सुटका होणे कठीण दिसते. मात्र त्यांंच्याकडून बरीच मोठी अपेक्षा केली जाते. त्या आपली जबाबदारी कायम पूर्ण करीत असतात.