Join us

​ट्विंकलला वाटते ‘लक्ष्मी प्रसाद’वर व्हावी चित्रपट निर्मिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 20:15 IST

एकेकाळची बॉलिवूड स्टार व खिलाडीकुमारची बायको ट्ंिवकल खन्ना हिला आपल्या नव्या पुस्तकातील लघुकथेवर चित्रपट तयार व्हावा असे वाटतेय. अशी ...

एकेकाळची बॉलिवूड स्टार व खिलाडीकुमारची बायको ट्ंिवकल खन्ना हिला आपल्या नव्या पुस्तकातील लघुकथेवर चित्रपट तयार व्हावा असे वाटतेय. अशी इच्छा तिने व्यक्त केली आहे. ट्विंकल ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ या नव्या लघुकथा संग्रहाचे प्रकाशन लवकरच करणार आहे. बॉलिवूडच्या हॉट कपलमध्ये समावेश असलेल्या अक्षय कुमार व ट्विंकल खन्ना हे कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. अक्षय कुमार आपल्या चित्रपटासाठी तर ट्विंकल खन्ना आपल्या वेगवेगळ्या अ‍ॅक्टिव्हिटीसाठी. मिसेस फनीबोन्सच्या माध्यामतून आपल्या विनोदी शैलीच्या लेखनाची झलक ट्विंकलने दाखविली आहे. आता ती पुन्हा एकदा नव्या पुस्तकाच्या माध्यमातून लोकांसमोर येत आहे. यावेळी तिने मिसेस फनीबोन्सच्या ऐवजी लक्ष्मीप्रसाद हे पात्र निवडले आहे. ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ असे या पुस्तकाचे नाव असून, यात चार लघुकथा असतील. या पुस्तकातील लघुकथांवर चित्रपटांची निर्मिती व्हावी असे तिला वाटू लागले आहे. ट्विंकल म्हणाली, ‘कादंबºयावर किंवा कथांवर चित्रपट तयार व्हावे ही चांगली संकल्पना आहे. यातून चित्रपटासाठी चांगली क था नक्कीच मिळू शकते. जेव्हा आपण एखादी कथा वाचत असतो तेव्हा आपल्या डोक्यात त्या कथेविषयी विश्व तयार होऊ लागते. त्याची नकल करता येत नाही, मात्र त्याला पडद्यावर उतरविण्याचा प्रयत्न नक्कीच केला जाऊ शकतो. लेखक व दिग्दर्शकाची कल्पनाशक्ती वेगवेगळी असू शकते, मात्र दोघेही चांगला प्रयत्न करू शकतात’. ट्विंकलचे पहिल्या पुस्तकाने चांगलीच प्रसिद्धी मिळविली होती. तिच्या विनोदी लेखन शैलीची अनेकांनी स्तुती केली. आता तिच्या आगामी ‘द लिजेंड आॅफ लक्ष्मी प्रसाद’ या पुस्तकाची आॅनलाईन बुकिंग सुरू असून, यावर चित्रपट निर्मिती व्हावी असाही प्रयत्न करताना दिसत आहे.