वो ट्वीट मेरी एक भूल थी, अफरीदी साहब के बहुत ऐहसान है मुझ पर... !आर्शी खानने मागितली माफी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2018 13:54 IST
‘कॉन्ट्रोवर्शियल गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी आर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, आर्शीने स्वत:च स्वत:चे नाव शाहिद ...
वो ट्वीट मेरी एक भूल थी, अफरीदी साहब के बहुत ऐहसान है मुझ पर... !आर्शी खानने मागितली माफी!!
‘कॉन्ट्रोवर्शियल गर्ल’ या नावाने ओळखली जाणारी आर्शी खान पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. होय, आर्शीने स्वत:च स्वत:चे नाव शाहिद अफरिदीशी जोडल्याबद्दल माफी मागितली आहे. आता हे नेमके प्रकरण काय, हे तुम्हाला कळायला हवे. होय, हे प्रकरण काही वर्षे जुने आहे. काही वर्षांआधी आर्शीने पाकिस्तानी क्रिकेट टीमचे दिग्गज आॅलराऊंडर शाहिद अफरिदीबद्दल एक वादग्रस्त ट्विट केले होते. २०१५ मध्ये आर्शीने तिच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर शाहिद अफरिदीबद्दल लिहिले होते. ‘हो, मी शाहिद अफरिदीसोबत सेक्स केले. मला कुण्या पुरूषाशी सेक्स करण्याआधी भारतीय मीडियाची परवानगी घ्यायला हवी काय? हे माझे खासगी आयुष्य आहे. माझ्यासाठी हे प्रेम आहे,’ असे ट्विट आर्शीने केले होते. या ट्विटनंतर सर्वत्र आर्शी नावाच्या या मॉडेलचीच चर्चा होती. पाकिस्तानी क्रिकेटरसोबत जाहीरपणे शरिरसंबंध असल्याची वाच्यता करणारी ही मॉडेल कोण, हे जाणून घेण्यास प्रत्येकजण उत्सूक होता. हीच आर्शी ‘बिग बॉस’च्या ११ व्या सीझनमध्ये दिसली होती. बिग बॉसच्या टॉप5 मधून आर्शी बाहेर झाल्यावर चाहते हैरान झाले होते. हीच आर्शी अलीकडे राजीव खंडेलवालच्या ‘जज बात’ या शोमध्ये आली. या शोमध्ये बोलताना आर्शीने तीन वर्षांपूर्वी केलेल्या त्या ट्विटबद्दलची माफी मागितली. शाहिद अफरिदीबद्दलचे ट्विट माझी चूक होती, असे आर्शी म्हणाली.‘मैं अफरीदी जी का काफी सम्मान करती हूं. उन्होंने मेरे लिए काफी कुछ किया है. वो ट्वीट मेरी एक भूल थी और मुझे इस तरह के सेंसिटिव मुद्दे में उनका नाम नहीं घसीटना चाहिए था. अफरीदी साहब के बहुत ऐहसान है मुझ पर,’ असे आर्शी म्हणाली.ALSO READ : Bigg Boss 11: नंतर एवढा बदलला अर्शी खानचा लूक,पाहा PHOTO