तब्बूने ‘गोलमाल अगेन’च्या सेटवरील तुषार कपूर, जॉनी लिव्हरसोबतचा सेल्फी केला शेअर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2017 19:13 IST
सध्या ‘गोलमाल’ सीरीजच्या चौथ्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद येथे सुरू आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री तब्बू हिने सेटवरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.
तब्बूने ‘गोलमाल अगेन’च्या सेटवरील तुषार कपूर, जॉनी लिव्हरसोबतचा सेल्फी केला शेअर!
सध्या ‘गोलमाल’ सीरीजच्या चौथ्या ‘गोलमाल अगेन’ या चित्रपटाची शूटिंग हैदराबाद येथे सुरू आहे. या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारत असलेली अभिनेत्री तब्बू हिने सेटवरील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोमध्ये अभिनेता तुषार कपूर आणि जॉनी लीव्हर हे सुद्धा दिसत असून, चित्रपटात काम करणे एखादा उत्सव साजरा करण्यासारखे असल्याचे तब्बूने म्हटले आहे. या चित्रपटाची शूटिंग ८ मार्च रोजी मुंबई येथे सुरू होणार आहे. त्यामुळे हैदराबादनंतर ही संपूर्ण टीम उटी पोहोचणार आहे, त्यानंतर गोवा येथे शूटिंग होणार आहे. दरम्यान, तब्बूने इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करताना त्याखाली लिहिले की, ‘हैदराबाद येथे मित्रांसोबत ‘गोलमाल अगेन’ची शूटिंग. तुषार, जॉनी लीव्हर या दोघांसोबत काम करणे एखादा उत्सव साजरा करण्यासारखे आहे’ या फोटोमध्ये तुषार आणि जॉनी अतिशय चांगल्या मुडमध्ये दिसत आहेत. फोटोवरून चित्रपटात कॉमेडीचा कसा तडका लावलेला असेल याचा अंदाज घेणे शक्य होते. ">http:// हा ‘गोलमाल’ सीरीजचा चौथा चित्रपट आहे. चित्रपट अजय देवगण, अरशद वारसी, कुणाल खेमू, श्रेयस तळपदे, तुषार कपूर आणि जॉनी लिव्हर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या सीरीजमध्ये परिणिती चोपडा, तब्बू, नील नितीन मुकेश आणि संजय मिश्रा कॉमेडीचा तडका लावताना बघावयास मिळणार आहेत. रोहित शेट्टी याच्या दिग्दर्शनाअंतर्गत बनविल्या जात असलेल्या या चित्रपटात जबरदस्त कॉमेडीचा तडका लावल्याचे दिसत आहे. शूटिंगदरम्यानच्या अनेक घडामोडी समोर येत असल्याने त्याचा प्रेक्षकांना अंदाज बांधणे शक्य होत आहे.