Join us

सलमान डिप्पीसाठी बनणार ‘ट्युबलाईट’ !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2016 09:02 IST

दीपिका पदुकोन ही सध्या विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बºयाच ...

दीपिका पदुकोन ही सध्या विन डिजेलसोबत ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ एक्झांडर केज’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. बºयाच दिवसांपासून ती हॉलीवूड जगतात बिझी असून बॉलीवूडला ती विसरली आहे का? तर नाही.लवकरच कबीर खान यांच्या आगामी चित्रपटात ती सलमान खानसोबत दिसणार आहे. या चित्रपटात ती मुख्य भूमिकेत दिसेल. सुत्रांच्या माहितीनुसार,‘ दीपिकाला या चित्रपटासाठी अखेर नक्की क रण्यात आलेले आहे. तिने एक वर्षापासून बॉलीवूडमध्ये कुठलाच चित्रपट साईन केलेला नाही.पण, आता तिच्या पहिल्या असाईनमेंटची घोषणा करण्यात आली आहे. आॅगस्टमध्ये चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करण्याची तयारी सुरू आहे. तोपर्यंत तिच्या ‘ट्रिपल एक्स’ चित्रपटाची शूटिंगही संपणार आहे. हा चित्रपट १९६० च्या दशकातील आहे.या चित्रपटात अजून एक हिरो असणार आहे, जो सलमानच्या भावाची भूमिका करणार आहे. चित्रपटाचे नाव सध्या ‘ट्युबलाईट’ ठेवण्यात आले आहे. सलमानला या चित्रपटात ‘ट्युबलाईट’ या नावाने ओळखले जाते.