Join us

तुम्ही ठरवणारे कोण? ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला मिळालेल्या निगेटीव्ह रिव्हुजमुळे खवळली मिनी माथूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2018 14:03 IST

पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या खराब प्रतिक्रियांमुळे ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नेमकी हीच गोष्ट दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिला खटकली आणि ती समीक्षकांवर चांगलीच खवळली.

आमिर खान व अमिताभ बच्चन यांचा ‘ठग्स आॅफ हिंदुस्तान’ दिवाळीच्या मुहूर्ताला प्रदर्शित झाला आणि दोनच दिवसांत या चित्रपटाने ८० कोटींचा गल्ला जमवला. कमाईचा हा आकडा आकर्षक वाटत असला तरी जाणकारांना यापेक्षा कितीतरी मोठा आकडा अपेक्षित होता. पण पहिल्याच दिवशी समीक्षकांनी दिलेल्या खराब प्रतिक्रियांमुळे या चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. नेमकी हीच गोष्ट दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूर हिला खटकली आणि ती समीक्षकांवर चांगलीच खवळली. एकापाठोपाठ एक तीन टिष्ट्वट करत, तिने आपला समीक्षकांवरचा संताप बोलून दाखवला. तुम्ही समीक्षक लोक चित्रपट रिलीज झाल्याच्या काहीच तासात चित्रपटाचे भविष्य कसे काय ठरवू शकता? असा खोचक प्रश्न तिने विचारला आहे.

‘ठग्स आॅफ हिंदुस्तानला मिळालेले निगेटीव्ह रिव्हूज पाहून मी अवाक् आहे. मी चित्रपट बघितला आणि तो मनोरंजक आहे. अमिताभ बच्चन यांना अनेक वर्षांनंतर अ‍ॅक्शन अवतारमध्ये पाहणे इंटरेस्टिंग आहे. आमिर खानही फिरंगी अवतारात जमून आला आहे. समुद्रातला थरार, महाकाय जहाज आहेत. लोकांनी हा चित्रपट पाहायला हवा. सर्वजण इतके गंभीर का?’ असे पहिले टिष्ट्वट तिने केले आहे. यानंतरच्या दुस-या टिष्ट्वटमध्ये तिने समीक्षकांना प्रश्न विचारला आहे.

‘माझा प्रत्येक चित्रपट समीक्षक व पत्रकाराला प्रश्न आहे. कुठल्याही चित्रपटाच्या रिलीजनंतर काही तासात तुम्ही त्याचे नुकसान करणे कसे काय करू शकता? प्रेक्षकांना स्वत: पाहून ठरवू द्या ना,’असे तिने म्हटले आहे. प्रेक्षकांना उद्देशून मिनीने तिसरे टिष्ट्वट केले आहे.

‘तुम्ही ३-४ लोकांना निर्णय घेण्याची शक्ती का देत आहोत. सिनेमा प्रत्येकासाठी आहे.  क्रिटिक ज्याबद्दल जराही चिंता करत नाही, कदाचित ते तुम्हाला आवडू शकेल,’ असे तिने म्हटले आहे.

टॅग्स :ठग्स आॅफ हिंदोस्तान