Join us

‘चित्रपटात फ्लॉप ठरली म्हणून ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न’; दिया मिर्झावर नेटिझन्सचा हल्लाबोल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2017 17:24 IST

गेल्या सोमवारी (१० जुलै) दहशतवाद्यांनी अमरनाथला जाणाºया भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार करीत भ्याड हल्ला केला. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू ...

गेल्या सोमवारी (१० जुलै) दहशतवाद्यांनी अमरनाथला जाणाºया भाविकांच्या बसवर बेछूट गोळीबार करीत भ्याड हल्ला केला. यामध्ये सात भाविकांचा मृत्यू तर ३२ भाविक गंभीर जखमी झाले. दहशतवाद्यांच्या या हल्ल्याचा देशभरात तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. काहींनी तर दहशतवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बॉलिवूड कलाकारांनीदेखील या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. परंतु अभिनेत्री दिया मिर्झा हिने वेगळाच सूर आळवल्याने, नेटिझन्समध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. नेटिझन्सनी दियावर हल्लाबोल करीत, चित्रपटांमध्ये फ्लॉप ठरत असल्याने ट्विटरवर स्टार होण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत असल्याचे म्हटले आहे. वास्तविक दिया मिर्झाने अमरनाथ गुहेचा शोध यावरून एक ट्विट केले होते. ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘१८५० मध्ये अमरनाथ गुहेचा शोध बूटा मलिक नावाच्या एका मुस्लीम व्यक्तीने लावला. हे स्थळ दोन्ही समुदायांमध्ये शांती आणि एकता निर्माण करण्याचे प्रतीक आहे.’ दियाच्या या ट्विटनंतर युजर्सनी तिच्यावर हल्लाबोल केला. एक युजर्सने ट्विटरच्या माध्यमातून दियाला विचारले की, ‘तू डॅमेज कंट्रोल करीत आहेस, परंतु हिंदूंवर झालेल्या या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करीत नाहीस.’ आणखी एका युजर्सने दियावर हल्ला करताना ट्विट केले की, ‘तू काश्मीरमधून हाकलून देण्यात आलेल्या काश्मिरी पंडितांविषयी एक शब्दही लिहत नाहीस. त्यांची मंदिरे कोणी उद्ध्वस्त केली?’ तर एका ट्विटरने लिहिले की, ‘तुझे चित्रपट चालत नसल्याने तू ट्विटरवर स्टार होण्याचा प्रयत्न करीत आहेस.’ युजर्सच्या या चौफेर हल्ल्यानंतर दिया मिर्झा काय उत्तर देईल याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, दियाच्या या वादग्रस्त ट्विटमुळे सोशल मीडियावर ती टीकेचे लक्ष्य ठरत आहे. दिया बºयाच कालावधीपासून चित्रपटांमधून गायब आहे. मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून ती नेहमीच चर्चेत असते.