Join us
Daily Top 2Weekly Top 5

'भूलभुलैया ३'साठी तृप्ती डिमरी नव्हती पहिली पसंती, दिग्दर्शकाने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 10:55 IST

Tripti Dimri : तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे.

अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri) मागील सात वर्षांपासून इंडस्ट्रीत सक्रीय आहे. तिच्या या प्रवासात लैला मजनू, कला आणि बुलबुल सारख्या अनेक दमदार सिनेमात काम केले आहे. या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. मात्र अभिनेत्रीला खरी ओळख 'अ‍ॅनिमल' सिनेमातून मिळाली. या चित्रपटातून तिला चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटानंतर प्रत्येक निर्माते-दिग्दर्शकांची पहिली पसंती बनली आहे.

तृप्ती डिमरी लवकरच कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३' या चित्रपटात दिसणार आहे. त्यांचा हा बहुप्रतिक्षित चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीजसाठी सज्ज आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अनीज बज्मी यांनी न्यूज १८ शोमध्ये संवाद साधताना सांगितले की, या चित्रपटासाठी तृप्ती कधीच पहिली पसंती नव्हती. दिग्दर्शकाच्या मनात तृप्तीला या चित्रपटात कास्ट करण्याचा कोणताही विचार नव्हता, पण गेल्या वर्षी तिला मिळालेल्या लोकप्रियतेनंतर अनीस बज्मी यांनी तिला 'भूल भुलैया ३'मध्ये कास्ट करण्याचा निर्णय घेतला.

अभिनेत्रीचे खूप कौतुक'ॲनिमल'मधील अभिनेत्रीच्या अभिनयाविषयी बोलताना ते म्हणाले की, तृप्ती डिमरीला रातोरात स्टारडम मिळाले असे मला वाटत नाही. आज तिला जी प्रसिद्धी मिळत आहे ती तिच्या इतक्या वर्षांची मेहनत आहे. गेल्या ७-८ वर्षांपासून ती चित्रपटसृष्टीत आहे आणि तिला एका दिवसात यश मिळालेले नाही.

दिग्दर्शक नव्या चेहऱ्याच्या शोधात होते'भूल भुलैया ३' मध्ये तृप्ती डिमरीला कास्ट करण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना ते म्हणाले की, मला या चित्रपटासाठी नवीन चेहरा हवा होता. मी अशा अभिनेत्रीच्या शोधात होतो जिने कार्तिक आर्यनसोबत कधीही काम केले नाही. आता चित्रपटातील तृप्तीचे काम पाहिल्यानंतर माझ्या टीमचे लोक म्हणू लागले आहेत की अनीस भाई, तुमचे तिच्याबद्दलचे मत बरोबर होते. ती खरंच खूप चांगली अभिनेत्री आहे.

टॅग्स :तृप्ती डिमरीकार्तिक आर्यनभूल भुलैय्या