Join us
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच आईवडिलांसोबत दिसली 'भाभी 2', अभिनेत्रीच्या बोल्ड सीन्सवर अशी होती प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 12:25 IST

तृप्ती डिमरी सध्या तिच्या एकामागोमाग येत असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. आधी Animal मधून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तर आता 'बॅड न्यूज' मध्ये तिने विकी कौशलसोबत इंटिमेट सीन्स दिले

Animal सिनेमानंतर सगळीकडे 'भाभी 2' आणि नॅशनल क्रश म्हणून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री तृप्ती डिमरी (Tripti Dimri). Animal नंतर तृप्तीने नुकत्याच आलेल्या 'बॅड न्यूज' सिनेमातही बोल्ड सीन्स दिले आहेत. तृप्तीने आपल्या मादक अदांमधून चाहत्यांवर भुरळच घातली आहे. काल तृप्ती पहिल्यांदा आईवडिलांबरोबर दिसली. यावेळी पापाराझींनी तृप्तीच्या कुटुंबियांनाही कॅमेऱ्यात कैद केले. 

तृप्ती डिमरी सध्या तिच्या एकामागोमाग येत असलेल्या सिनेमांमुळे चर्चेत आहे. आधी Animal मधून तिने प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेतलं. तर आता 'बॅड न्यूज' मध्ये तिने विकी कौशलसोबत इंटिमेट सीन्स दिले. नुकतंच तृप्ती तिच्या आईवडिलांसोबत दिसली. डिनरनंतर ती त्यांच्यासोबत बाहेर आली तेव्हा पापाराझींनी त्यांना घेरलं. पहिल्यांदाच तिचे आईवडिलही कॅमेऱ्यात कैद झाले. त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तृप्ती डिमरी हिमाचल प्रदेशमधील मध्यमवर्गीय कुटुंबात जन्माला आली. आज तिला Animal सिनेमामुळे ओळख मिळाली असली तरी तिने याआधी 'बुलबुल','कला','लैला मजनू' या सिनेमांमध्ये उल्लेखनीय काम केले. तिने 'पोस्टर बॉइज' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. 

बोल्ड भूमिकांवर अशी होती पालकांची प्रतिक्रिया

तृप्तीने गेल्या  काही सिनेमात दिलेल्या इंटिमेट सीन्सवर तिच्या आईवडिलांची काय प्रतिक्रिया होती असा प्रश्न तिला विचारण्यात आला होता. यावर ती म्हणाली की,"मी अशा सीन्सबद्दल आईवडिलांना कल्पना दिली होती. मी अभिनयाला सुरुवात केली तेव्हाच त्यांचा मला विरोध होता. त्यांना माझा निर्णय मान्य नव्हता. पण मी नंतर त्यांना तो विश्वास दिला की मी काहीही चुकीचं करणार नाही. मी ज्यात कंफर्टेबल आहे तेच मी करेन. पण सिनेमा पाहिल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की हे जरा अतीच आहे पुढच्या वेळी जरा सांभाळून कर."

Animal नंतर तृप्तीला सिनेमांची लॉटरीच लागली. अभिनेत्री आगामी 'धडक 2', 'भूलभूलैय्या 3', 'आशिकी 3', 'Aniaml पार्क' सह आणखी काही सिनेमांमध्ये झळकणार आहे.

टॅग्स :तृप्ती डिमरीबॉलिवूडसोशल मीडिया