Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिकिनी फोटोवरून दिशा पटानी होतेय ट्रोल; युजर्सने उठविली टीकेची झोड!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2017 15:39 IST

अभिनेत्री दिशा पटानी सध्या श्रीलंका येथे तिच्या बॉयफ्रेंडसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तेथील एक फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे, ज्यामुळे सध्या ती ट्रोल होत आहे.

अभिनेत्री दिशा पटानी सध्या बॉयफ्रेंड टायगर श्रॉफसोबत श्रीलंका येथे व्हेकेशन एन्जॉय करीत असून, तिने त्याचे काही फोटो इन्स्टाग्रामवर अपलोड केले आहेत. त्यात तिने एक बिकिनी फोटोही तिच्या चाहत्यांसाठी शेअर केला आहे. परंतु या फोटोवरून दिशा ट्रोल होत असून, सातत्याने तिच्यावर युजर्सकडून टीका केली जात आहे. फोटोमध्ये दिशा पांढºया रंगाच्या बिकिनीमध्ये समुद्राच्या काठावर बसलेली दिसत आहे. दिशाच्या या फोटोला एका दिवसाच्या आत सात लाखांपेक्षा अधिक लोकांनी लाइक केले आहे. मात्र ज्या पद्धतीने या फोटोला लाइक मिळत आहेत, त्याच पद्धतीने त्यावर टीका करणाºया कॉमेण्ट्सही दिल्या जात आहेत. एका युजरने लिहिले की, ‘न्यूड फोटो शेअर करून ही थकली आहे, आता तरी हिला कोणीतरी चांगला बॉलिवूड चित्रपट मिळवून द्यावा!’एका अन्य युजरने लिहिले की, ‘बॉलिवूडमध्ये सुंदरतेत तू इतर अभिनेत्रींच्या तुलनेत सर्वाधिक हॉट आहेस. परंतु मला ही बाब अजूनही कळाली नाही की, तिला मोठ्या प्रॉडक्शनचे चित्रपट का मिळत नाहीत?’ एका युजरने लिहिले, ‘ही मुलगी आता हातातून गेली आहे.’ दरम्यान, या फोटोमध्ये दिशाचा चेहरा बघावयास मिळत नाही, यावरूनही चाहत्यांनी तिच्यावर टीकेची झोड उठविली आहे. काही चाहत्यांनी तिचे समर्थनही केले आहे. दिशाच्या एका चाहत्याने लिहिले की, ‘कृपा करून अशा प्रकारचे फोटो अपलोड करू नकोस, कारण लोक त्याला व्हल्गर कॉमेण्ट्स देतात.’ दरम्यान, दिशा सध्या बॉयफ्रेंड टायगरसोबत व्हेकेशन एन्जॉय करीत आहे. त्याचबरोबर ती त्याच्यासोबतच ‘बागी-२’ मध्येही काम करीत आहे. यापूर्वी दिशाने ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘कुंग फू योगा’ यासारख्या चित्रपटांमध्ये काम केले आहे. आता ती ‘बागी-२’ मध्ये झळकणार असून, चाहते या चित्रपटाच्या प्रतीक्षेत आहेत.