ट्रिपल एक्स-थ्री दीपिकाचा हॉट लूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 00:33 IST
ट्रिपल एक्स-थ्री दीपिकाचा हॉट लूकबॉलीवूडमधील सेक्सी आणि सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या आगामी ‘ट्रिपल एक्स-थ्री’ या चित्रपटाबद्दल सर्वत्र ...
ट्रिपल एक्स-थ्री दीपिकाचा हॉट लूक
ट्रिपल एक्स-थ्री दीपिकाचा हॉट लूकबॉलीवूडमधील सेक्सी आणि सुंदर अभिनेत्री दीपिका पदुकोन हिच्या आगामी ‘ट्रिपल एक्स-थ्री’ या चित्रपटाबद्दल सर्वत्र उत्सुकता आहे. हॉलीवूडमधील तिचा हा पहिलाच चित्रपट. यात विन डिझेलसारख्या दिग्गज अॅक्शन हिरोसोबत संधी मिळाल्याने दीपिकाची लॉटरीच लागली. ४८ वर्षीय विन डिझेल याने अलीकडेच या चित्रपटाच्या शुटिंगचा एक फोटो इन्स्टाग्राम या सोशल साईटवर शेअर केला आहे. यात दीपिका कमालीची हॉट दिसली आहे. चित्रपटाचा दिग्दर्शक डी. जे. कर्सुओ यानेही ३० वर्षीय ‘मस्तानी गर्ल’चा दिलखेचक फोटो शेअर केलाय. या चित्रपटात नीना दोब्रेव्ह, सॅम्युअल जॅकसन, रूबी रोझ, जेट ली, टोनी जा यांच्याही महत्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २०१७मध्ये रिलीज होणार आहे.