श्रद्धांजली : हे आहेत, ओम पुरी यांचे काही अविस्मरणीय चित्रपट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 14:19 IST
memorable movies and roles of verteran actor om puri : om puri : . १९७२ साली अभिनयक्षेत्रात आलेल्या ओम पुरी यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. पण त्यांच्या काही भूमिका कायम स्मरणात राहतील. त्यावर एक ओझरती नजर...
श्रद्धांजली : हे आहेत, ओम पुरी यांचे काही अविस्मरणीय चित्रपट
ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी(६६) यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मुख्य धारेतील चित्रपटांसोबतच समांतर चित्रपट गाजवणारा एक हरहुन्नरी अभिनेता आज आपल्यातून गेला. १९७२ साली अभिनयक्षेत्रात आलेल्या ओम पुरी यांनी ३०० हून अधिक चित्रपटात भूमिका केल्या. पण त्यांच्या काही भूमिका कायम स्मरणात राहतील. त्यावर एक ओझरती नजर...अर्धसत्य १९८३ मध्ये आलेल्या ‘अर्धसत्य ’ या चित्रपटातील ओम पुरी यांनी साकारलेली भूमिका त्यांच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट भूमिका आहे. यात त्यांनी प्रामाणिक पण कर्तव्यात कमी पडलेल्या एका पोलिस अधिकाºयाची भूमिका साकारली होती. यासाठी ओम पुरी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या राष्ट्रीय पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आक्रोश स्मिता पाटील, नसीरूद्दीन शाह आणि ओम पुरी यांच्या सन १९८० मध्ये आलेल्या ‘आक्रोश’ या चित्रटात ओम पुरींची भूमिका यादगार ठरली. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला. या चित्रपटासाठी ओम पुरी यांना सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.आस्था १९९७ मध्ये ओम पुरी यांनी अभिनेत्री रेखासोबत एक अतिशय बोल्ड सिनेमा केला होता. त्याचे नाव होते, ‘आस्था’. यात ओम पुरी यांनी रेखाचा पती अमर याची भूमिका साकारली होती. यात दोघांमध्ये अनेक बोल्ड सीन्स चित्रीत करण्यात आले होते.तमस भीष्म साहनी यांच्या नॉवेलवर आधारित ‘तमस’ या चित्रपटात ओम पुरी यांनी नाथूची भूमिका साकारली होती. आपली गर्भवर्ती पत्नी आणि वृद्ध आईला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणारा नाथू आजही सिनेप्रेमींच्या मनात जिवंत आहे.आरोहण सावकाराच्या जाचात अडकलेल्या हरी या गरीब शेतकऱ्याची भूमिका ओम पुरी यांनी ‘आरोहण’मध्ये साकारली होती. याच भूमिकेने ओम पुरी यांना त्यांच्या आयुष्यातील पहिलावहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला होता.जाने भी दो यारों ‘जाने भी दो यारों’या ब्लॅक कॉमेडी प्रकारात मोडणाºया चित्रपटातील ओम पुरींची भूमिकाही यादगार ठरली. यात त्यांनी अहुजा नावाच्या भ्रष्ट व्यक्तीची भूमिका साकारली होती. द्रोहकाल दिग्दर्शक गोविंद निहलानी आणि अभिनेता ओम पुरी या जोडीचा तिसरा सिनेमा म्हणजे ‘द्रोहकाल’. दहशतवादावर केंद्रीत या चित्रपटात ओम पुरी यांनी डीसीनी अभय सिंह याची भूमिका साकारली होती. आशिष विद्यार्थी, मीता वशिष्ठ, मिलिंद गुणाजी, नसीरूद्दीन शाह यांच्या यात मुख्य भूमिका होत्या.चाची 420 कमल हसन यांच्या ‘चाची 420’ या चित्रपटात ओम पुरी यांनी पुन्हा एकदा विनोदी भूमिका साकारली. कमल हसन, अमरिश पुरी आणि परेश रावल यांच्यासोबतच्या सहाय्यक भूमिकेत स्वत:ची छाप सोडण्यात ओम पुरी यशस्वी ठरले. यात त्यांनी बनवारी लाल पंडितची भूमिका साकारली होती.गांधी बेल किंग्सले यांच्या ‘गांधी’ या चित्रपटात ओम पुरी यांची अतिशय छोटी पण महत्त्वपूर्ण भूमिका होती. या चित्रपटातील एका ओळीच्या भूमिकेसाठी ओम पुरी यांनी अनेक दिवस मेहनत घेतली होती. या पात्रात जीव ओतण्यासाठी त्यांनी त्या काळातील लोकांची मानसिकता समजण्यासाठी अनेक पुस्तके वाचून काढली होती. कारण चित्रपटात त्यांच्या या एका ओळीच्या डॉयलॉगनंतर दंगली थांबल्या होत्या. त्यामुळे त्यांनी या भूमिकेसाठी प्रचंड तयारी केली होती.ईस्ट इज वेस्ट डेमियन ओडोनेटच्या ‘ईस्ट इज वेस्ट’ या १९९९ मध्ये आलेल्या चित्रपटात ओम पुरी यांनी ब्रिटनमध्ये राहणाºया एका पाकिस्तानी प्रवाशाची भूमिका साकारली होती. यातील ओम पुरींची भूमिका ही ब्रिटीश चित्रपटांत एखाद्या भारतीय अभिनेत्याने साकारलेली सर्वाधिक उल्लेखनीय भूमिका मानली जाते.मकबूल सन २००३ मध्ये आलेल्या विशाल भारद्वाज यांचा ‘मकबूल’ हा सिनेमा तसा पंकज कपूर, इरफान खान व तब्बू यांचा चित्रपट मानला जातो. मात्र यात ओम पुरी आणि नसीरूद्दीन शाह या जोडीच्या अभिनयाला तोड नाही. यात ओम पुरी आणि नसीर यांनी भ्रष्ट पोलिस अधिकाºयांची भूमिका साकारलेली आहे.दी जंगल बुक यावर्षी ‘दी जंगल बुक’ या अॅनिमेटेड चित्रपटाने बॉक्सआॅफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडले. या चित्रपटात मोगलीचा सर्वाधिक विश्वासू मित्र म्हणजे भगिरा या पात्रात ओम पुरी यांनी आवाज दिला होता.