Join us

Trending: शिल्पा शेट्टीचा असाही मराठी बाणा,व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2020 16:54 IST

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकरनं गायलं आहे. शिल्पानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली होती.

हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांना मराठी प्रेमाचं भरतं आले आहे. अनेक दिग्गज बॉलीवूड कलाकारांना मराठी सिनेमा आकर्षित करत आहे. अक्षय कुमार, प्रियांका चोप्रा यासारखे कलाकार मराठी सिनेमा निर्मिती क्षेत्रात उतरले आहेत. आमिर खाननेसुद्धा वेळोवेळी त्याचा मराठी बाणा दाखवला आहे. मराठी सिनेमांचे हिंदी रिमेक तयार होत आहेत. काही कलाकार मराठी सिनेमात कामही करत आहेत. अशाच कलाकारांपैकी बॉलिवूड कलाकार मराठीच्या प्रेमात असल्याचे पाहायला मिळाले आहेत. यात शिल्पा शेट्टीही मागे नाही. तिने कोणत्या मराठी सिनेमात काम केले नाही किंवा कोणत्या मराठी सिनेमाची निर्मिती केली नाही तर. टीक -टॉकवर तिने मराठीतील सुप्रसिद्ध गाण्यावर व्हिडीओ केला आहे. त्याला समर्पक असे कॅप्शनही दिले आहे. 

@theshilpashetty

Tumcha saathi, mi Marathi... kasha vaatle haav bhaav??? 🤔##Marathi##marathimulgi##betweenshots##fyp

♬ original sound  - Zee Marathi Official

शिल्पानं बनवलेला टिकटॉक व्हिडिओ चाहत्यांच्या पसंतीस पात्र ठरला असून  तिच्या चेहऱ्यावरचे उत्कृष्ट हावभाव पाहून चाहते तिच्यावर फुल ऑन फिदा होत असल्याचे पाहायला मिळत आहेत. 

ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत आर्या आंबेकरनं गायलं आहे. शिल्पानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर आर्यानं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्टोरी शेअर केली होती. आर्यानं गायलेल्या शिर्षक गीतावर शिल्पानं टिकटॉक व्हिडिओ बनवल्यानं तिनं देखील आनंद व्यक्त करत 'फॅनगर्ल' असं म्हटलं होत.

तुर्तास शिल्पाचा हा मराठी बाणा भलताच भाव खाऊन गेला असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात शिल्पा मराठी रूपेरी पडद्यावर झळकल्यास आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे  शिल्पानेही लवकरात लवकर मराठी सिनेमात  भूमिका साकारावी अशी तिच्या फॅन्सची इच्छा असेल हे मात्र नक्की. 

टॅग्स :शिल्पा शेट्टी