Trending: पाहा, गुरमीत राम रहिम यांच्या ‘हिंद का नापाक को जवाब’चा ट्रेलर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2017 11:42 IST
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेवर आधारित ‘हिंद का नापाक जवाब- एम.एस.जी. लायन हार्ट२’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत.
Trending: पाहा, गुरमीत राम रहिम यांच्या ‘हिंद का नापाक को जवाब’चा ट्रेलर
भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात राबवलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेवर आधारित ‘हिंद का नापाक जवाब- एम.एस.जी. लायन हार्ट२’ या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झालाय. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख गुरमीत राम रहिम सिंह या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारताना दिसणार आहेत. केवळ एवढेच नाही तर याच चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक तेच आहेत. चित्रपटाचे गीतकार, संगीतकार आणि कोरिओग्राफर तेच आहेत. रिलीजपूर्वीच या चित्रपटाच्या नावावर विविध रेकॉर्ड नोंदवले गेले आहेत. यात एकाचवेळी सर्वाधिक लोकांनी सिग्नेचर स्टेप करणे, देशभक्तीची शपथ घेणे, सर्वाधिक लोकांसोबत ट्रेलर लॉन्च आदींचा समावेश आहे. गुरमीत राम रहिम सिंह तसे आध्यात्मिक गुरु आहेत. पण आपले शिष्य आणि जगातील आपल्या चाहत्यांना चांगला संदेश देण्यासाठी त्यांनी म्युझिक अल्बम आणि चित्रपट काढणे सुरु केले आहे. ‘हिंद का नापाक जवाब- एम.एस.जी. लायन हार्ट२’ हा त्यांचा चौथा चित्रपट आहे. हा चित्रपट गत सप्टेंबरमध्ये भारतीय लष्कराने साकारलेल्या सर्जिकल स्ट्राईक मोहिमेवर आधारित आहे. या चित्रपटात बाबा जबरदस्त अॅक्शन करताना दिसणार आहे. तसेच या चित्रपटात त्यांचा कधी नव्हे तो रोमॅन्टिक अवतारही पाहायला मिळणार आहे. यासंदर्भात बाबांना विचारले असता ते म्हणाले, कॅमेºयासमोर रोमॅन्टिक दृश्य देताना मी बराच नव्हर्स होाते. कारण सर्व मुलींना मी माझ्या मुली मानतो.या चित्रपटातून मिळणारा संपूर्ण नफा जनकल्याणासाठी वापरण्याची घोषणाही बाबांनी केली. या चित्रपटातून जो काही पैसा मिळेल, त्यातून ‘बोन बँक’ उघडली जाईल, असे त्यांनी सांगितले.या चित्रपटाच्या म्युझिक लॉन्चवेळी बाबा आपल्या फिल्मी गेटअपमध्ये म्हणजे एका टँकवरून स्टेजवर आले होते. येत्या १० फेबु्रवारीला हा चित्रपट रिलीज होतोय. देशांतील सुमारे साडे तीन हजार स्क्रीर्न्सवर हिंदीशिवाय तामिळ, तेलगू, मल्याळम आणि इंग्रजी सबटाईटलसह हा चित्रपट रिलीज होणार आहे. तूर्तास त्याचा ट्रेलर आपण सर्वांनी पाहायलाच हवा.