Join us

Ragini MMS Returns 2 : सनी लिओनीच्या 'रागिनी एमएमसएस रिटर्न्स २'चा ट्रेलर रिलीज, सस्पेन्सला बोल्डनेसचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2019 20:15 IST

Ragini MMS Returns Season 2 : अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच कालावधीनंतर रागिनी एमएमसएस सीरिजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे.

 मैं बेबी डॉल दी सोनी दी... असं म्हणत आपल्या तालावर सर्वांना थिरकायला लावणारी बॉलिवूडची बेबी डॉल म्हणजेच अभिनेत्री सनी लिओनी बऱ्याच कालावधीनंतर रागिनी एमएमसएस सीरिजमधून रसिकांच्या भेटीला येत आहे. रागिनी एमएमएस रिटर्न्स २मध्ये सनी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये सस्पेन्स, अ‍ॅक्शन, थ्रिलर सोबतच हॉरर आणि बोल्डनेसचा जबरदस्त तडका पाहायला मिळत आहे. या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

रागिनी एमएमएस रिटर्न्स २च्या ट्रेलरमध्ये रागिनी श्रॉफची झलक दाखवण्यात आली आहे. ही भूमिका दिव्या अग्रवाल साकारते आहे. ती वेब सीरिजमध्ये एका स्ट्रॉग मुलीची भूमिका बजावत आहे. ती तिची मैत्रिण वर्षासाठी एक बॅचलर पार्टी ठेवते. या पार्टीसाठी रागिनी तिच्या गर्ल्स गँग सोबत ट्रीपवर जाते. ज्या ठिकाणी त्याच्या आधीच एक बॉइज गँग पार्टीसाठी आलेली असते. हे सर्वजण एका हॉटेलमध्ये जातात आणि तिथूनच सिनेमाच्या कथेला सुरुवात येते. याच ठिकाणीपासून सीरिजमध्ये ट्विस्ट आणि टर्न्स यायला सुरू होतात. या वेबसीरिजमध्ये वरुण सूद हॉटेल मालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.सनी लिओनीची मुख्य भूमिका असलेली रागिनी एमएमएस रिटर्न्स ही वेबसीरिज येत्या १८ डिसेंबरला झी ५वर पाहता येणार आहे. सनी लिओनी दिव्या अग्रवाल आणि वरुण सूद यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या वेब सीरिजमध्ये या तिघांचाही खूपच बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे. याशिवाय या वेब सीरिजमध्ये सनी लिओनी ‘हॅलो जी’ गाण्यावर डान्स सुद्धा करताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच हे गाणं रिलीज झालं असून त्यालाही प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता. 

टॅग्स :सनी लिओनीसनी लियोनी