काहीच क्षणात येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर...!! पाहायला मिळू शकतात, या गोष्टी!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2017 09:17 IST
‘बाहुबली2’चा ट्रेलर रिलीज व्हायला आता केवळ काही क्षण उरले आहेत. चित्रपट रिलीज व्हायला अजून अवकाश आहे. त्यामुळे ‘बाहुबली2’चा ट्रेलर ...
काहीच क्षणात येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर...!! पाहायला मिळू शकतात, या गोष्टी!!
‘बाहुबली2’चा ट्रेलर रिलीज व्हायला आता केवळ काही क्षण उरले आहेत. चित्रपट रिलीज व्हायला अजून अवकाश आहे. त्यामुळे ‘बाहुबली2’चा ट्रेलर पाहणे लोकांसाठी कमी मोठा आनंद नाही. हैदराबादेतील अनेक थिएटरमध्ये ‘बाहुबली2’चा ट्रेलर दाखवला जाणार आहे. त्यामुळे लोकांची उत्सूकता शिगेला पोहोचली आहे, हे सांगणे नकोच. त्याआधी या ट्रेलरमध्ये काय असणार, हे तुम्हाला कळले तर? मज्जा येईल ना? तर तेच आम्ही तुम्हाला सांगतो आहोत...एकापेक्षा एक सरस अॅक्शन सीन्स ‘बाहुबली’मध्ये दिग्दर्शक एस.एस. राजमौली यांनी जबरदस्त अॅक्शन सीन्स दाखवले होते. ‘बाहुबली2’मध्येही असेच जबरदस्त अॅक्शन सीन्स पाहायला मिळणार, हे नक्की आहे. त्यामुळे उद्या रिलीज होणाºया ‘बाहुबली2’च्या ट्रेलरमध्ये याची लहानशी झलक तुम्हाला नक्कीच पाहायला मिळणार आहे.ALSO READ : ‘या’ तारखेला असा सज्ज; येणार ‘बाहुबली2’चा ट्रेलर!!भल्लाळदेवाचे भयंकर रूप भल्लाळदेव पहिल्या भागात मेलेला आहे. त्यामुळे दुसºया भागात त्याचे भयंकर रूप दिसणे अपेक्षित आहे. अलीकडे एका मुलाखतीत, भल्लाळदेवाची भूमिका साकारणाºया राणा डग्गुबती यांनी याचे संकेत दिले होते. उद्याच्या ट्रेलरमध्ये भल्लाळदेवाच्या या रूपाचे ओझरते दर्शन तुम्हा-आम्हाला होऊ शकते.देवसेनाचा महारानी अवतार ‘बाहुबली’च्या पहिल्या भागात राणी देवसेना हिचा महाराणी अवतार पाहायला मिळाला नव्हता. मात्र ‘बाहुबली2’च्या ट्रेलरमध्ये देवसेना महाराणी रूपात पाहायला मिळेल, अशी अपेक्षा आहे.देवसेना व अमरेन्द्र बाहुबलीची प्रेमकथा अलीकडे ‘बाहुबली2’च्या एका पोस्टरमध्ये देवसेना व अमरेन्द्र बाहुबली यांच्या प्रेमाची एक झलक दिसली होती. ट्रेलरमध्येही या दोघांचा प्रेमरस दिसेल, अशी अपेक्षा आहे.कटप्पाचे नवे रूप कटप्पाने बाहुबली को क्यों मारा? याचे उत्तर ‘बाहुबली2’मध्ये आपल्याला मिळणार आहे. पण तत्त्पूर्वी उद्या रिलीज होणाºया ट्रेलरमध्ये कटप्पाचे दर्शन घडेल, असा अंदाज आहे.