पारंपारिक वेशात डिप्पी अॅण्ड विन?
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2016 11:43 IST
दीपिका पादुकोण हिने नुकतीच तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाचे विन डिजेलसोबतचे शूटींग ...
पारंपारिक वेशात डिप्पी अॅण्ड विन?
दीपिका पादुकोण हिने नुकतीच तिचा हॉलीवूड डेब्यू ‘ट्रिपल एक्स : द रिटर्न आॅफ झांडर केज’ चित्रपटाचे विन डिजेलसोबतचे शूटींग संपवले आहे. ती चित्रपटाचे शूटींग सुरू झाल्यापासून सातत्याने तिचे इन्स्टाग्राम आणि टिवटर अकाऊंट अपडेट करत होती.त्यात तिचे चित्रपटातील फर्स्ट लुक आणि फोटो ती अपलोड करत होती. नुकताच तिने एक फोटो सोशल साईटवर अपलोड केला आहे. ज्यात ते दोघेही अत्यंत पारंपारिक वेशात दिसत आहे. विन शेरवाणी ड्रेसमध्ये दिसत असून ती देखील पारंपारिक वेशात अगदी हॉट दिसत आहे.’