‘टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा येत्या २२ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय, चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. सोनाक्षीवर चित्रीत हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायलेल्या ‘मुंगडा’चे रिमेक व्हर्जन आहे. १९७७ मध्ये आलेल्या ‘इंकार’ या चित्रपटातील हे गाणे उषा मंगेशकर यांनी गायले आहे.
Total Dhamaal! ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:36 IST
‘टोटल धमाल’ हा मल्टी स्टारर कॉमेडी ड्रामा येत्या २२ फेबु्रवारीला प्रदर्शित होतोय. पण त्याआधी या चित्रपटाचे एक गाणे वादात सापडले आहे. होय, चित्रपटातील सोनाक्षी सिन्हावर चित्रीत ‘मुंगडा’ या रिमिक्स गाण्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
Total Dhamaal! ‘मुंगडा’चे रिमिक्स व्हर्जन पाहून भडकल्या उषा मंगेशकर!!
ठळक मुद्दे‘टोटल धमाल’मध्ये सोनाक्षीवर चित्रीत ‘मुंगडा’ गाणे हिट बनवण्यासाठी मेकर्सनी कुठलीही कसर सोडलेली नाही. अगदी सोनाक्षीने या गाण्यावर अतिशय बोल्ड मुव्ह केल्या आहेत. पण इतके करूनही या गाण्यावर प्रचंड टीका होतेय.