Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘टॉमी सिंग’ बद्दल मीराची प्रतिक्रिया!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2016 09:57 IST

 शाहीद कपूर याने आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये ‘टॉमी सिंग’ ची भूमिका केली आहे. टॉमी सिंगचा अवतार पाहून कुणालाही ...

 शाहीद कपूर याने आगामी चित्रपट ‘उडता पंजाब’ मध्ये ‘टॉमी सिंग’ ची भूमिका केली आहे. टॉमी सिंगचा अवतार पाहून कुणालाही त्याची भीती वाटेल किंवा किळस येईल असाच तो आहे.शाहीदने ड्रगच्या आहारी गेलेल्या टॉमी सिंग या रॉकस्टारची भूमिका चित्रपटात केली आहे. एका मुलाखतीदरम्यान शाहीदला जेव्हा मीराची टॉमी सिंगबद्दलची प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा तो म्हणाला,‘ ती माझ्यापासून दोन इंच अंतरावर बसलेली होती. पण, जेव्हा मध्यांतर झाले तेव्हा ती माझ्यापासून दोन फूट अंतरावर गेलेली होती.(हसत हसत) ती म्हणाली की,‘मला खरंच सांग की, तु टॉमी सिंग नाहीयेस ना?’ याचाच अर्थ मीराला शाहीदची भूमिका अत्यंत खरी आणि योग्य वाटली.