Join us
Daily Top 2Weekly Top 5

आपल्या सहकारी कलाकारांसोबत वाढदिवसाचा केक कापायचे टॉम अल्टर, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2017 15:15 IST

आज सकाळीच प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांच्या निधनाची बातमी समोर आली अन् बॉलिवूडमध्ये एकच हळहळ व्यक्त केली गेली. अनेक ...

आज सकाळीच प्रसिद्ध अभिनेते टॉम अल्टर यांच्या निधनाची बातमी समोर आली अन् बॉलिवूडमध्ये एकच हळहळ व्यक्त केली गेली. अनेक दमदार भूमिका साकारून इंडस्ट्रीत स्वत:चे वलय निर्माण करणाºया टॉम यांनी अनेक भूमिका अजरामर केल्या. टॉम अल्टर अभिनेता म्हणून जेवढे दमदार होते, तेवढेच एक माणूस म्हणूनही त्यांच्यातील माणूसकी वाखण्याजोगी होती. माणसाला माणूस म्हणून ओळखणे हे त्यांच्या आयुष्यातील सूत्र होते. त्यामुळेच ते सर्वांना सोबत घेऊन आयुष्यातील प्रत्येक आनंद साजरा करायचे. त्यांचा प्रत्येक वाढदिवस अविस्मरणीय करण्यासाठी ते सहकारी कलाकारांसोबत केक कापायचे. त्यांनी कधीही स्वत:ला वेगळ्या रांगेत उभे केले नाही. नेहमीच सर्वांसोबत त्यांनी चालायचे असे धोरण राबविले. टॉम अल्टर अभिनयात खूपच माहीर होते. त्यामुळेच त्यांनी ३०० पेक्षा अधिक चित्रपटांमध्ये भूमिका साकारून स्वत:ला सिद्ध केले. त्याचबरोबर कित्येक मालिकांमध्येही त्यांनी भूमिका साकारल्या. टॉम यांनी त्यांच्या करिअरमध्ये ऐवढ्या भूमिका साकारल्या, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांची संख्या करोडोंमध्ये पोहोचली. टॉम यांचे सहकारी यश मिश्रा यांनी बॉलिवूड लाइफशी बोलताना त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी सांगितल्या. यश मिश्रा आणि टॉल अल्टर यांनी डीडी किसान वाहिनीवरील ‘अपनी तो पाठशाला’ या मालिकेत काम केले. यश मिश्रा यांनी सांगितले की, ‘टॉम अल्टर सर खूप वर्सेटाइल अभिनेता होते. त्यांनी इंडस्ट्रीतील अनेक बड्या दिग्दर्शकांसमवेत काम केले होते. अशात मला त्यांच्याबरोबर काम करायला मिळाल्याने मी स्वत:ला भाग्यवान समजतो. मी टॉम सर यांच्याबरोबर तीन शेड्यूल केले होते. ते खूप शांत स्वभावाचे व्यक्ती होते. एक वरिष्ठ अभिनेता म्हणून त्यांना व्हिआयपी ट्रिटमेंट दिली जात होती. परंतु त्यांना हे फारसे आवडत नसायचे. ते आम्हा सर्वांसोबत राहणे पसंत करायचे. त्यांना चेष्टा मस्करी करायला खूप आवडायची. ते त्यांचा वाढदिवस आमच्यासोबत सेलिब्रेट करायचे. त्यांना सर्व सहकाºयांच्या उपस्थित वाढदिवसाचा केक कापायला खूप आवडायचे. मी त्यांच्यासोबत काम करताना अभिनयाच्या अनेक बारीकसारीक गोष्टी शिकलो. यावेळी यश यांनी टॉम अल्टर यांच्यासोबतच्या वाढदिवसाचे काही फोटोज् शेअर केले.