...चित्रपटाचे शीर्षक होते काहीसे वेगळे!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2016 10:10 IST
रणबीर क पूर, ऐश्वर्या रॉय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिकेतील ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट ...
...चित्रपटाचे शीर्षक होते काहीसे वेगळे!
रणबीर क पूर, ऐश्वर्या रॉय बच्चन, अनुष्का शर्मा आणि फवाद खान यांच्या मुख्य भूमिकेतील ‘ऐ दिल हैं मुश्किल’ चित्रपट नुकताच टीझर रिलीज झाल्यानंतर प्रचंड चर्चेत आला. चित्रपटाचे कथानक आणि गाणी कशी असतील? अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.दिग्दर्शक करण जोहर याने या चित्रपटाचे शीर्षक अगोदर ‘ऐ दिल’ एवढेच ठेवले होते. पुढील ‘हैं मुश्किल’ हे नंतरचे वाढवलेले दोन शब्द कलाकार आणि टीमने गाणे ऐकल्यानंतर तयार करण्यात आले आहेत. करणला सुरूवातीपासूनच चित्रपटाचे नाव ‘ऐ दिल हैं मुश्किल’ असे हवे होते.मात्र, मुश्किल हा शब्द संपूर्ण टीमला काहीसा निगेटीव्ह वाटला. पण, कथानकानुसार, प्रेमातील गुंतागुंत हा विषय यात अधोरेखित करावयाचा होता.प्रितमने जेव्हा शीर्षक गीत बनवले तेव्हा चित्रपटाचे शीर्षक ‘ऐ दिल हैं मुश्किल’ च व्हायला हवे हे निश्चित झाले.‘तु सफर मेरा, हैं तु ही मेरी मंजिल...तेरे बिना गुजारा...ऐ दिल हैं मुश्किल..’ चित्रपट दिवाळीला रिलीज होणार आहे.