Join us

घरी बसून कंटाळलात? मग स्विकारा शाहरूख खानचा ‘हा’ स्पेशल टास्क!!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 17:34 IST

सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कुणालाही घरी बसून राहण्याची एवढी सवय नसल्याने आपल्या सर्वांनाच घरी बसून खुप कंटाळा आला आहे. मात्र, आता ही तुमची चिंता मनातून काढून टाका... आता तुम्ही म्हणाल ते का?

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरश: थैमान घातले आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच जण घरी बसून आहेत. सामान्यांपासून ते सेलिब्रिटींपर्यंत कुणालाही घरी बसून राहण्याची एवढी सवय नसल्याने आपल्या सर्वांनाच घरी बसून खुप कंटाळा आला आहे. मात्र, आता ही तुमची चिंता मनातून काढून टाका... आता तुम्ही म्हणाल ते का? तर बॉलिवूडचा किंग खान शाहरूखने चाहत्यांसाठी एक स्पेशल टास्क आणला आहे. हा टास्क पूर्ण करणाऱ्या  चाहत्याला चक्क शाहरुखसोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची संधी मिळणार आहे. शाहरुखने त्याच्या सोशल मीडियावर हा टास्क पूर्ण करण्याचे चॅलेंज दिले आहे. चला तर मग सगळी काळजी विसरा आणि क्रिएटिव्ह व्हिडीओ शूट करण्यास सुरूवात करा. 

शाहरूख खानने त्याच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यात त्याने या टास्कचे सर्व डिटेल्स दिले आहेत. शाहरुखने लिहिले, ‘सध्या लॉकडाऊनमुळे आपल्या सर्वांकडेच बराच रिकामी वेळ आहे. मला वाटतं यामध्ये आपण काहीतरी मजेदार करू शकतो. काहीतरी क्रिएटिव्ह करून हा वेळ सत्करणी लावू शकतो. हॉरर सिनेमा पाहायला सर्वांना आवडतं. आता या लॉकडाऊनमध्ये आपण सर्वंच वेगवेगळे सिनेमा पाहून वेळ घालवत आहोत त्यापेक्षा स्वत:मधल्या फिल्ममेकरला जागवा आणि एक इनडोअर हॉरर फिल्म शूट करा.’

शाहरुखने त्याच्या चाहत्यांना हॉरर फिल्म शूट करण्याचे चॅलेंज केले आहे. पण याला काही नियम सुद्धा आहेत. यानुसार तुम्ही कोणताही कॅमेरा वापरू शकता. ज्यात तुम्ही घरातल्या प्रॉपचा वापर करू शकता. ही फिल्म तुम्ही एक पेक्षा जास्त लोकांसोबत शूट करु शकता. मात्र यात सोशल डिस्टंसिंगची काळजी घेणे गरजेचे आहे.

शाहरुखने त्याच्या पोस्टमध्ये सांगितले आहे की, १८ मे पर्यंत तुम्ही तुमची फिल्म teamdigital@redchillies.com  वर पाठवायची आहे. ही फिल्म पॅट्रिक ग्राहम, विनित कुमार, आहाना कुमरा आणि गौरव वर्मा जज करतील या नुसार तीन लकी चाहत्यांना शाहरुख सोबत व्हिडीओ कॉलवर बोलायची संधी मिळणार आहे. चला तर मग कामाला लागा...

टॅग्स :शाहरुख खानबॉलिवूड