Join us

तर हा व्यक्ती काढायचा तैमूरचे व्हायरल होणारे फोटो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2017 14:02 IST

 तैमूरचे सगळे फोटो गेल्या वर्षाभरापासून आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले आहेत. स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव सगळ्यात वर ...

 तैमूरचे सगळे फोटो गेल्या वर्षाभरापासून आपण सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहिले आहेत. स्टार किड्सच्या यादीत तैमूरचे नाव सगळ्यात वर आहे. तैमूर कुठेही दिसला तरी मीडियाचे कॅमेरे त्याचे फोटो काढण्यासाठी सज्ज असायचे.  जेवढी चर्चा बी टाऊनमध्ये सैफ आणि करिना व्हायची नाही तेवढी फक्त तैमुरचीच होते. तैमुरचे जे फोटो आतपार्यंत मीडियावर व्हायरल झाले ते सगळे कुणाल खेमूने काढले आहेत. याचा खुलासा खुद्द तैमूरचा काका कुणालने केला. गोलमाल अगेनच्या निमित्ताने दिलेल्या इंटरव्ह्यु दरम्यान दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला. कुणाला म्हणाला की, ‘तुम्हाला गंमत वाटेल, पण तैमुरचे व्हायरल होत असलेले सर्व फोटो मीच काढले आहेत.’ सैफ आणि करीनाच्या मुलाला एक सेलिब्रिटी सारखेच ट्रीट केलं जातं हे तर आपणास माहीत आहेच, त्याचे फोटो सतत काही न काही कारणाने व्हायरल होत असतात. तैमूरला मीडियापासून दूर ठेवण्यासाठी सैफ आणि करिनाने त्याला दूर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला ते शिक्षणासाठी इंग्लंड ला पाठवणार आहेत.ALSO READ : सैफ-करिनाच्या लाडक्या तैमूरचा डुप्लिकेट तुम्ही बघितला काय? पहा व्हिडीओ!अलीकडे एका मुलाखतीत सैफने तैमूरबद्दल चिंता व्यक्त केली. तैमूर एक चिमुकला जीव आहे. त्याच्या डोळ्यांत कमालीचा निष्पापपणा आहे. त्याच्याभोवतीच्या स्टारडमची कल्पना आम्हाला आहे. करिना व मी याबद्दल चर्चाही केलीय. पण या सगळ्यांमुळे त्याचे लहानपण, त्याचा निष्पापपणा प्रभावित होऊ नये, असे आम्हाला वाटत आहे. त्यामुळे आम्ही त्याला इंग्लडच्या एका चांगल्या बोर्डिंग स्कूलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. आशा आहे, या निर्णयामुळे सगळे काही ठीक होईल, असे सैफ म्हणाला. दरम्यान तैमूरचे फोटो काढणाऱ्या कुणाल खैमूच्या आयुष्यात ही इनाया नावाच्या सुंदर परीचे आगमन झाले आहे. नुकताच इनायाने सुद्धा इन्स्टाग्रामवर एंट्री घेतली आहे. सोहाने वडील आणि मुलीचा एक क्षण कॅमरामध्ये टिपला आणि तो  इन्स्टाग्रामवर पोस्ट केला.कुणालने आपल्याला मुलगी झाल्याची गोड बातमी स्वतःच्या ट्वीटर अकाऊंटवर दिली होती. दिवाळीत कुणालाचा गोलमाल अगेन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.