Join us

मोदींकडे नाही इरफानसाठी वेळ! राहुल गांधी, केजरीवालांचा मात्र होकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2016 19:05 IST

फिल्म प्रोमोशनसाठी काय काय फंडे वापरण्यात येतील याचा काही नेम नाही. आमिर-शाहरुखलाही मागे टाकत इरफान खानने आता एक अजबच ...

फिल्म प्रोमोशनसाठी काय काय फंडे वापरण्यात येतील याचा काही नेम नाही. आमिर-शाहरुखलाही मागे टाकत इरफान खानने आता एक अजबच प्रोमोशन फंडा अंमलात आणला आहे. इतर स्टार छोट्यापडद्यावरील विविध शोज्मध्ये हजेरी लावण्यात गुंग असताना इरफानने थेट पंतप्रधान, काँग्रेस उपाध्यक्ष आणि दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनाच मुलाखतीसाठी आमंत्रण दिले.आगामी ‘मदारी’ चित्रपटासाठी इरफान विविध नेत्यांना भेटून त्यांची एक सामान्य व्यक्तीच्या दृष्टीकोनात मुलाखत घेतोय. ट्विटरवरून त्याने नरेंद्र मोदी, राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांना अशाच मुलाखतीसाठी भेटण्याची विनंती केली. ‘मी देशाचा एक सामान्य व्यक्ती आहे. तुम्हाला भेटून काही प्रश्न विचारायचे आहेत. आपण भेटू शकतो का?’ अशा आशयाचे त्याने तिघांना ट्विट्स केले.इरफानच्या विनंतीला केजरीवाल यांनी चार तासांनंतर सर्वप्रथम उत्तर दिले. दोघांनी ट्विटरवरच मंगळवारी सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री कार्यालयात भेटण्याचे ठरवले. राहुल गांधींनीदेखील सकारात्मक प्रतिसाद देत इरफानला संपर्क क्रमांक पाठवण्याची विनंती केली.आता केजरीवाल आणि गांधी यांनी जरी इरफानला भेटण्याचे मान्य केले असले तरी पंतप्रधानांनी मात्र व्यस्त असल्याचे सांगितले. पंतप्रधान कार्यालयातर्फे ट्विटरवरून इरफानला सांगण्यात आले की, मोदी सध्या संसदीय अधिवेशनात व्यस्त असून तुमचे प्रश्न पत्राद्वारे विचारा.अद्याप इरफानने यावर कोणतेच उत्तर दिलेले नाही. परंतु प्रधानमंत्री भेटणार नाही म्हटल्यावर त्याची निराशा झाली असणार हे नक्की. या आधी त्याने बिहारचे पूर्व मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची मुलाखत घेतली आहे. या सगळ्यातून एक गोष्ट मात्र स्पष्ट दिसतेय की, इरफान प्रोमोशनचा नवीन ट्रेंड सेट करतोय.