Join us
Daily Top 2Weekly Top 5

५५ वर्षीय अभिनेत्यावर आलीय काम मागण्याची वेळ; झळकलाय बिग बी आणि बॉबी देओलसोबत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 10:09 IST

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचा मुलगा, ज्याने अनुराग कश्यपच्या टीव्ही शो 'आशीर्वाद'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या करिअरमध्ये त्याने असे अनेक चित्रपट केले ज्यात त्यांच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली. वयाच्या या टप्प्यावरही त्याला काम मागावे लागते.

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध विनोदी कलाकाराचा मुलगा, ज्याने अनुराग कश्यपच्या टीव्ही शो 'आशीर्वाद'मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यांच्या करिअरमध्ये त्याने असे अनेक चित्रपट केले ज्यात त्यांच्या भूमिकांना खूप पसंती मिळाली. वयाच्या या टप्प्यावरही त्याला काम मागावे लागते. तो म्हणतो की तो कोणतेही काम करू शकतो. पण त्याची एक अट आहे.

एक काळ असा होता जेव्हा या अभिनेत्याने सर्व काही मागे टाकले आणि एका अमेरिकन कंपनीत काम करायला सुरुवात केली. मात्र, नंतर त्याने आपला विचार बदलला आणि त्याला पुन्हा या कलाविश्वात येण्याची संधी मिळाली. त्याने त्याच्या कारकिर्दीत अनेक चढउतार पाहिले. या अभिनेत्याने आपल्या करिअरमध्ये करिश्मा कपूर, बॉबी देओल, सलमान खान आणि अमिताभ बच्चन यांसारख्या बड्या कलाकारांसोबतही काम केले आहे. आज तो हात जोडून लोकांना कामासाठी विनंती करत आहेत. हा अभिनेता म्हणजे नासिर खान (Nasir Khan).

मी सक्षम असेल तर...अभिनेता नासिर खान यांनी काम न मिळाल्याची व्यथा व्हिडिओच्या माध्यमातून व्यक्त केली. नुकताच त्याने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर करून आपली व्यथा मांडली. व्हिडिओमध्ये तो म्हणत आहे, 'मी नासिर खान आहे. मी अनेक टीव्ही शो केले आहेत. एक वेब सिरीज केली आहे. तुम्ही मला चित्रपटांमध्येही पाहिलं असेल. जर तुम्हाला वाटत असेल की मी काही लायक आहे, तर कृपया मला कॉल करा. मी काम करायला तयार आहे. पण ऑडिशन द्यायची नाही. ऑडिशन देण्याची ताकद आणि धैर्य माझ्यात नव्हते. मी आता ऑडिशन देऊ शकत नाही आणि देऊ इच्छित नाही.

अमिताभ बच्चन, करिश्मा यांच्यसोबत केलंय काम नासिरने आपल्या करिअरमध्ये अनेक स्टार्ससोबत काम केले आहे. नासिरने २००१ मध्ये आलेल्या 'आशिक' चित्रपटात करिश्मा कपूर आणि बॉबी देओलसोबत काम केले होते. या चित्रपटात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्याने बॉबी देओलच्या मित्राची भूमिका साकारली होती. २००३ मध्ये आलेल्या बागबान या मल्टीस्टारर चित्रपटातही तो अमिताभ यांच्या मुलाच्या भूमिकेत दिसला होता. त्याच्या एका मुलाखतीत त्याने असेही नमूद केले होते की इंडस्ट्रीने आपल्याला बाजूला केले आहे. यानंतर तो अमेरिकेला गेला. तिथल्या एका कंपनीत कामाला सुरुवात केली.