‘टायगरची गर्लफ्रेंड नव्हे मी तर धोनीची हिरोईन’
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2016 14:11 IST
अभिनेत्री दिशा पटानीला हैदराबादेत चाहत्यांच्या वाईट व्यवहाराचा सामना करावा लागला आहे. हैदराबादेत एका कार्यक्रमाला पोहचलेल्या दिशाला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच ...
‘टायगरची गर्लफ्रेंड नव्हे मी तर धोनीची हिरोईन’
अभिनेत्री दिशा पटानीला हैदराबादेत चाहत्यांच्या वाईट व्यवहाराचा सामना करावा लागला आहे. हैदराबादेत एका कार्यक्रमाला पोहचलेल्या दिशाला पाहण्यासाठी चाहत्यांनी एकच गर्दी केली. या गर्दीतील काहींनी दिशाला ओढण्याचा प्रयत्न केला. या ओढाताणीत दिशाच्या हातावर व पाठीवर जखमा झाल्यात. अर्थात दिशा मात्र या वाईट व्यवहाराने दुखावण्याऐवजी आनंदात आहे. हा आनंद कुठला तर नवी ओळख मिळाल्याचा. होय, आपल्याला पाहायला गर्दी उसळली, याचेच म्हणे दिशाला अप्रूप वाटतेय. अभिनेत्री म्हणून नवी ओळख मिळाल्याचा आनंद तिला झालाय.‘एम.एस. धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ या चित्रपटात धोनीच्या गर्लफ्रेण्डची भूमिका साकारणाºया दिशाने या चित्रपटापूर्वी एका व्हिडिओ अल्बममध्येही काम केलयं. मात्र याऊपरही आजपर्यंत टायगर श्रॉफची गर्लफ्रें ड एवढीच दिशाची ओळख बनून राहिली होती. पण आता दिशा खूश आहे. हैदराबादेतील चाहत्यांचा प्रतिसाद म्हणजे माझी खरी ओळख आहे, असे ती मानते. ‘एम.एस. धोनी: दी अनटोल्ड स्टोरी’ने मला ओळख दिली. लोकांनी मला पाहण्यासाठी गर्दी करावी, यातच सगळे आले, असे दिशा म्हणाली. टायगरची गर्लफ्रेन्ड म्हणून नव्हे तर हिरोईन म्हणून लोक मला पाहायला एकत्र आले, हेच तर दिशाला यातून सुचवायचे नाही ना?