Join us

टायगर का फिरतोय रस्त्यांवर?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 11:06 IST

 शीर्षक वाचून काही असे ठरवू नका की, ‘बागी’ चित्रपट काय अपयशी वगैरे ठरला. आणि टायगर श्रॉफला आता त्यामुळे त्याला ...

 शीर्षक वाचून काही असे ठरवू नका की, ‘बागी’ चित्रपट काय अपयशी वगैरे ठरला. आणि टायगर श्रॉफला आता त्यामुळे त्याला चक्क रस्त्यावर यावे लागले. असे काही झालेले नाहीये.. तर टायगर हा अगोदरच फॅन फ्रेंडली आहे.त्याला एक सेलिब्रिटी म्हणून नव्हे तर स्वच्छंद आणि सामान्य माणसासारखं आयुष्य जगायला आवडतं. नेहमीच त्याच्यासोबत बोलण्यातून, मुलाखतीतून ते जाणवतं. तर टायगर काही रस्त्यावर आला नाही.तर त्याचा मुड आला म्हणून त्याने त्याच्या फॅन्सला घराबाहेर पडून भेटण्याचे ठरवले. काही हौशी चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटोही काढून घेतले. टायगरने २०१४ मध्ये कृती सेननसोबत ‘हिरोपंती’ चित्रपटातून डेब्यू केला होता.