Join us

प्लीज, मेरे बच्चे को न घसीटे...! संतापली टायगर श्रॉफची आई, अनुराग कश्यपने मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2020 17:09 IST

वाचा काय आहे प्रकरण

ठळक मुद्दे  अनुरागचे हे ट्विट पाहून टायगर श्रॉफ तर काही बोलला नाही. पण त्याची आई आयशा मात्र भडकली.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजमचा मुद्दा चांगलाच तापला आहे. अशात बॉलिवूडचे काही सेलिब्रिटी सोशल मीडियावर चांगलेच चर्चेत आहेत.  अभिनेत्री कंगना राणौत आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप त्यापैकीच दोघे. अनुराग व कंगना यांचे टिष्ट्वटरवॉर सध्या चांगलेच चर्चेत आहे. अशात अनुरागने एक ट्विट केले आणि या ट्विटमुळे त्याला कंगना नाही तर टायगर श्रॉफची आई आयशा श्रॉफ हिची माफी मागावी लागली.आता कंगना व अनुरागच्या भांडणात टायगर आणि त्याची आई आयशा कुठून आलेत, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर त्यासाठी तुम्हाला पुढची बातमी वाचावी लागेल.

तर त्याचे झाले असे की, अनुराग नेपोटिजमच्या मुद्यावर मीडियावर घसरला. यासाठी त्याने एक ट्विट रिट्विट केले. या टिष्ट्वटमध्ये तैमूर आणि टायगरचा फोटो होता. ‘हा मीडियाने पसरवलेला घराणेशाहीचा वाद आहे का?   मीडिया देखील अशा गोष्टी दाखवते ज्या प्रेक्षकांना पाहायला आवडतात. त्यामुळे हा मीडिया आणि प्रेक्षकांकडून पसरवला जाणारा घराणेशाही वाद नाही?’ असे हे ट्विट होते.

  अनुरागचे हे ट्विट पाहून टायगर श्रॉफ तर काही बोलला नाही. पण त्याची आई आयशा मात्र भडकली. ती लगेच या ट्विटवर रिअ‍ॅक्ट झाली. ‘कृपा करून माझ्या मुलाला या सर्वात खेचू नका. तो त्याच्या मेहनतीने इथपर्यंत पोहोचला आहे,’ अशा शब्दांत आयशाने अनुरागला सुनावले.आयशाचे ते ट्विट पाहून अनुरागला आपल्या चुकीची जाणीव झाली असावी. त्याने लगेच आयशाची माफी मागितली. ‘ मला माफ कर आयशा. मला असे म्हणायचे नव्हते. मीडिया नेहमी तैमूर बाबत सांगत असते असे मला म्हणायचे होते. जर मी तुझ्यया भावना दुखावल्या असतील तर मनापासून सॉरी,’अशा शब्दांत अनुरागने आयशाची माफी मागितली.

टॅग्स :अनुराग कश्यपटायगर श्रॉफ