Join us

"हर आशिक विलन है"; टायगर श्रॉफच्या 'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर, श्रेयस तळपदे - उपेंद्र लिमयेने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 16:06 IST

'बागी ४'चा जबरदस्त ट्रेलर रिलीज झाला आहे. टायगर श्रॉफच्या भूमिकेने पुन्हा एकदा प्रेक्षकांचं लक्ष वेधलं आहे

बहुप्रतिक्षित चित्रपट ‘बागी ४’चा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून, यात अभिनेता टायगर श्रॉफ एका नव्या आणि आधीच्या सिनेमांपेक्षा अधिक हिंसक भूमिकेत दिसत आहे. ‘बागी’ फ्रँचायझीचा हा चौथा भाग आहे. विशेष म्हणजे यावेळी संजय दत्त मुख्य खलनायक म्हणून टायगर श्रॉफला भिडणार आहे. ट्रेलरमध्ये मराठी अभिनेते उपेंद्र लिमये आणि श्रेयस तळपदे यांच्याही खास भूमिका आहेत. जाणून घ्या ‘बागी ४’च्या ट्रेलरबद्दल

‘हर आशिक एक व्हिलन है’

‘बागी ४’ चा ट्रेलर खूपच ॲक्शन-पॅक आणि रक्तरंजित आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये टायगर श्रॉफचा ‘रॉनी’ नावाचा नायक एका वेगळ्या अवतारात दिसत आहे. तो एका प्रेम कहाणीचा बदला घेण्यासाठी निघाला आहे, पण त्यात एक मोठा ट्विस्ट आहे. जेव्हा खलनायक म्हणून संजय दत्तची एन्ट्री होते. संजय आणि टायगरमध्ये मोठा संघर्ष दिसतो. दोघेही एकमेकांच्या जीवावर उठलेले दिसतात. आता यामागचं कारण काय? हे चित्रपट रिलीज झाल्यावरच कळेल. चित्रपटाचा ट्रेलर दमदार अॅक्शन आणि तगड्या संवादांनी भरलेला आहे.

संजय दत्तची खतरनाक एंट्री

‘बागी ४’ मध्ये संजय दत्त खलनायकाच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये त्याची एंट्री खूपच दमदार आणि भीतीदायक आहे. त्याच्या पात्राची तुलना 'ॲनिमल' चित्रपटातील बॉबी देओलच्या पात्राशी केली जात आहे. संजय दत्त एका मोठ्या चाकूने लोकांना मारताना आणि सिगार पेटवताना दिसतो, ज्यामुळे त्याचा क्रूरपणा स्पष्ट दिसतो. टायगर श्रॉफ आणि संजय दत्त यांच्यातील जोरदार टक्कर प्रेक्षकांना अनुभवायला मिळेल.

या चित्रपटात टायगर श्रॉफ, संजय दत्त, हरनाझ संधू आणि सोनम बाजवा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. ए. हर्षा यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे, आणि याची निर्मिती साजिद नाडियादवाला यांनी केली आहे. ‘बागी ४’ हा चित्रपट मागील भागांपेक्षा अधिक हिंसक आणि भावनिक असल्याचे म्हटले जात आहे, ज्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट ५ सप्टेंबर २०२४ ला रिलीज होणार आहे. टायगर श्रॉफच्या चाहत्यांना यानिमित्ताने अभिनेत्याची तगडी अॅक्शन बघायला मिळेल, यात शंका नाही.

टॅग्स :टायगर श्रॉफसंजय दत्तबॉलिवूडटेलिव्हिजनटिव्ही कलाकार