Join us
Daily Top 2Weekly Top 5

टायगर श्रॉफ अगोदर ‘या’ तरुणावर होते दिशा पाटनीचे प्रेम; बायोसेक्शुअल असल्याने झाले ब्रेकअप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 19:35 IST

अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाने दोनच दिवसांत ४५ ...

अभिनेत्री दिशा पाटनी आणि टायगर श्रॉफचा ‘बागी-२’ हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर तुफान कमाई करीत आहे. चित्रपटाने दोनच दिवसांत ४५ कोटी रुपयांचा गल्ला जमविला आहे. दिशाचा बॉयफ्रेंड टायगरसोबतचा हा पहिलाच चित्रपट आहे. अशात या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावत असल्याचे दिसून येत आहे. त्याचबरोबर दोघांच्या अफेअरची चर्चाही यानिमित्त रंगत आहे. परंतु टायगर हे दिशाचे पहिले प्रेम नसून, एक टीव्ही अभिनेता तिचे पहिले प्रेम आहे. होय, पार्थ समथान असे या टीव्ही अभिनेत्याचे नाव असून, दिशा कधीकाळी त्याला डेट करायची. मात्र एक वर्षापेक्षा अधिक काळ त्यांच्यातील रिलेशनशिप टिकू शकली नाही. दिशा त्यावेळी पार्थला डेट करायची जेव्हा ती इंडस्ट्रीत फारशी अ‍ॅक्टिव नव्हती. तर पार्थ त्यावेळी चांगलाच प्रसिद्धीझोतात होता. या दोघांमधील ब्रेकअपचे कारण टीव्ही निर्माता विकास गुप्ता असल्याचे बोलले जाते. त्याचे झाले असे की, २०१६ मध्ये विकासवर मोलेस्टेशनचा आरोप करण्यात आला होता. वास्तविक हे दोघे गे रिलेशनशिपमध्ये होते. रिपोर्टनुसार पार्थ बायसेक्शुअल आहे. जेव्हा त्याचे दिशासोबत अफेअर सुरू होते, त्याचवेळी त्याचे विकाससोबतही अफेअर सुरू होते. अशात जेव्हा ही बाब दिशाच्या लक्षात आली, तेव्हा तिने त्याच्यासोबत ब्रेकअप केले.सध्या दिशा टायगरला डेट करीत आहे. दोघे नेहमीच सिनेमागृह, हॉटेल आणि पार्ट्यांमध्ये एकत्र बघावयास मिळतात. रिपोर्ट्सनुसार, एकदा हे दोघे फॉर्महाउसमध्ये हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी गेले होते. परंतु अशातही अद्यापपर्यंत या दोघांनी त्यांच्यातील नात्याची जाहीरपणे कबुली दिली नाही. उत्तर प्रदेशातील बरेली येथे जन्मलेली दिशा लहानपणापासून अभ्यासात हुशार आहे. तिचे वैज्ञानिक बनायचे स्वप्न होते. परंतु २०११ मध्ये तिने बायोटेकचे शिक्षण घेतानाच मॉडलिंगला सुरुवात केली. येथूनच तिचा अभिनय क्षेत्रातील प्रवास सुरू झाला.