Join us
Daily Top 2Weekly Top 5

टायगर श्रॉफच्या सिनेमात अंकिता लोखंडेची एन्ट्री, वाचा काय आहे प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2019 16:40 IST

साजिद नाडियादवाला 'बागी 3' सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमात आता अंकिता लोखंडेची देखील एन्ट्री झाली आहे.

साजिद नाडियादवाला 'बागी 3' सिनेमा वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. मीडिया रिपोर्टनुसार या सिनेमात आता अंकिता लोखंडेची देखील एन्ट्री झाली आहे. टायगर श्रॉफ आणि श्रद्धा कपूरसोबत या सिनेमात तीदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. अंकिताने कंगना राणौतच्या मणिकर्णिका सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.अंकिताने करिअरची सुरुवात 'पवित्र रिश्ता' या मालिकेतून केली.  अंकिताची ही पहिलीच मालिका हिट ठरली. 

सध्या अंकिता तिच्या लव्ह लाईफला घेऊन चर्चेत आहे. अंकिता व विकी जैन या दोघांचा रोमान्स अगदी जोरात सुरु आहे. अंकिता व विकीच्या  अफेअरच्या चर्चा ब-याच दिवसांपासून सुरु आहेत. पण अंकिता यावर काहीही बोलायला तयार नव्हती. पण नुकतीच तिने या नात्याची कबुली दिली होती. विकीसोबतचे  काही फोटो तिने सोशल मीडियावर पोस्ट केले असून तिने आपल्या प्रेमाची जाहिर कबुली दिली होती. या फोटोत विकी आपल्या गुडघ्यांवर बसून अंकिताला प्रपोज करताना दिसला होता. 

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता काही काळ सिंगल होती. याचदरम्यान  विकी जैन याने तिच्या आयुष्यात एन्ट्री घेतली.  

विकी  जैनचा बॉलिवूडशी संबध नाही. तो एक उद्योगपती आहे. तो बॉक्स क्रिकेट लीगमधील मुंबई टीमचा को-ओनर आहे.  सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर अंकिता व विकी एकमेकांच्या जवळ आलेत. दोघांच्याही मित्रांना या रिलेशनशिपबद्दल ठाऊक होते.

टॅग्स :अंकिता लोखंडे