Join us

गर्लफ्रेंडचा फोटो काढल्याने संतापला टायगर श्रॉफ, पहा फोटो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2017 18:03 IST

अभिनेत्री दिशा पाटनी आणि तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना ‘बागी-२’मधून बघावयास मिळणार आहेत. या चित्रपटासाठी ...

अभिनेत्री दिशा पाटनी आणि तिचा बॉयफ्रेंड टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करताना ‘बागी-२’मधून बघावयास मिळणार आहेत. या चित्रपटासाठी सध्या दोघेही प्रचंड मेहनत घेत आहेत. रिअल लाइफ कपल असल्याने दोघेही बºयाच ठिकाणी एकत्र फिरताना स्पॉट होत आहेत. याबाबतचे त्यांचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. खरं तर जेव्हा-जेव्हा टायगर आणि दिशा एकत्र असतात तेव्हा-तेव्हा मीडियाच्या कॅमेºयांची नजर त्यांच्यावर असते. विशेष म्हणजे टायगर आणि दिशा बिनधास्तपणे मीडियाच्या कॅमेºयांचा सामना करीत असल्याने त्यांचे बरेचसे फोटोज् काढण्याची संधी मिळते. मात्र आता जे फोटोज् समोर आले आहेत, त्यावरून टायगरचा मूड फारसा चांगला नसल्याचे दिसून येत आहे. कारण पहिल्यांदा टायगर मीडियाच्या कॅमेºयांवर राग व्यक्त करताना दिसून आला आहे. त्याचे झाले असे की, टायगर आणि दिशा वर्कआउट करण्यासाठी एकत्र पोहोचले होते. मात्र त्याठिकाणी अगोदरच उपस्थित असलेले मीडियाचे कॅमेरे बघून तो चांगलाच संतापला होता. त्यामुळे त्याने उपस्थित फोटोग्राफर्सला खूपच डेडली लूक दिला. वृत्तांत प्रसिद्ध केलेले फोटो बघून ही बाब तुमच्या लक्षात येईल. वास्तविक हे दोघे पहिल्यांदाच एकत्र स्पॉट झाले असे नाही. नुकतेच टायगरने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दिशासोबतचा स्विमिंग पुलातील एक हॉट फोटो शेअर केला होता. यावेळी दिशाने टायगरच्या खाद्यांवर हात ठेवलेला होता. परंतु वर्कआउटला जात असताना टायगर श्रॉफचा एवढा संताप का झाला असेल याचा मात्र  उलगडा झाला नाही. असो, टायगर अन् दिशाच्या ‘बागी-२’बद्दल सांगायचे झाल्यास साजिदने थायलंड, हॉँगकॉँग, लॉस एंजलिस, अमेरिका आणि चीनमधील काही तांत्रिक आणि अ‍ॅक्शन दिग्दर्शकांना ‘बागी-२’ या चित्रपटाशी जोडले आहे. साजिद नाडियाडवाला निर्मित ‘बागी-२’ फॉक्स स्टार स्टूडिओ आणि नाडियाडवाला ग्रॅँडसन एंटरटेन्मेंटद्वारा प्रस्तुत केला जाणार आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी २७ एप्रिलला रिलीज होणार आहे.